एटीएम फोडणाऱ्यांचा शोध नाही

By Admin | Updated: December 22, 2015 04:38 IST2015-12-22T04:38:49+5:302015-12-22T04:38:49+5:30

एटीएम कापून २५ लाखांची रोकड पळविणाऱ्या लुटारूंचा शोध लावण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. दुसरीकडे

There is no searching for those who break the ATM | एटीएम फोडणाऱ्यांचा शोध नाही

एटीएम फोडणाऱ्यांचा शोध नाही

नागपूर : एटीएम कापून २५ लाखांची रोकड पळविणाऱ्या लुटारूंचा शोध लावण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. दुसरीकडे अशाच प्रकारच्या घटना घडल्यामुळे लुटारूंची छायाचित्रे मिळविण्यासाठी हैदराबाद, वर्धा आणि अन्य ठिकाणची पोलीस पथके नागपुरात येत आहेत.
१६ डिसेंबरच्या रात्री वाडी, वानाडोंगरी आणि हिंगणा परिसरातील तीन एटीएम फोडून लुटारूंनी २५ लाख रुपये लंपास केले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक मध्य प्रदेशसह ठिकठिकाणी जाऊन आले, मात्र लुटारूंचा छडा लागलेला नाही.(प्रतिनिधी)

Web Title: There is no searching for those who break the ATM