शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

अधिकार क्षेत्राचा मुद्दा निकाली काढण्यासाठी वरिष्ठ पीठ हवे

By admin | Updated: February 14, 2016 02:59 IST

सहकारी खंडपीठांच्या अधिकार क्षेत्राचा मुद्दा निकाली काढण्यासाठी वरिष्ठ पीठ गठित करण्याची शिफारस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्य न्यायमूर्तींना केली आहे.

उच्च न्यायालयाची मुख्य न्यायमूर्तींना विनंती : पाच वर्षांत नागपूर, औरंगाबाद खंडपीठातून ४८६ प्रकरणांचे मुंबईकडे स्थानांतरनागपूर : सहकारी खंडपीठांच्या अधिकार क्षेत्राचा मुद्दा निकाली काढण्यासाठी वरिष्ठ पीठ गठित करण्याची शिफारस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्य न्यायमूर्तींना केली आहे. तसेच २०१० ते २०१५ या पाच वर्षांच्या काळात मुंबईकडे स्थानांतरित करण्यात आलेली संपूर्ण प्रकरणे संबंधित खंडपीठांकडे परत केली जावी, असे मत न्या. अरुण चौधरी यांनी एका प्रकरणाच्या निकालात व्यक्त केले.२०१० ते २०१५ या काळातील नागपूर खंडपीठातील एकूण २०७ प्रकरणे आणि औरंगाबाद खंडपीठातील २०१२ ते २०१५ या काळातील २७९ प्रकरणे मुंबईकडे स्थानांतरित करण्यात आली. मुख्य न्यायमूर्तींना ‘मास्टर आॅफ रोस्टर’ म्हणून प्रकरणे एका पीठाकडून दुसऱ्या पीठाकडे स्थानांतरित करण्याचे अधिकार आहेत. न्या. अरुण चौधरी यांनी असे नमूद केले की, ज्या प्रकरणांची पूर्ण सुनावणी झाली, ज्या प्रकरणांची सुनावणी टप्प्याटप्प्याने सुरू आहे, जी प्रकरणे स्वीकारल्या जाण्याच्या स्तरावर निकाली काढण्यासाठी आहेत किंवा जी प्रकरणे निर्णयासाठी ठेवली आहेत, ती एकत्र करून अचानकपणे कोणतेही कारण नमूद न करता प्रशासकीय विशेष हक्कांतर्गत स्थांतरित करण्यात आलेली आहेत. या प्रकारामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील पक्षकारांवर गंभीर परिणाम झालेला आहे. उच्च न्यायालयाच्या पीठासीन न्यायाधीशाकडे सुनावणीची प्रक्रिया सुरू असलेली प्रकरणे कोणत्याही कारणांशिवाय मुख्य पीठाकडे स्थानांतरित करणे ही बाब कमकुवतपणा लेखणारी आणि संबंधित न्यायाधीशाचा मानभंग करणारी तसेच न्यायाधीशावर संशय निर्माण करणारी आहे. ही बाब न्यायाधीशांच्या स्वातंत्र्यावर स्पष्ट अधिक्रमण करणारी आहे, असा निष्कर्ष न्या. चौधरी यांनी काढला.कोणतेही प्रकरण स्थानांतरित करताना गोपनीयता बाळगल्यास त्याचा थेट परिणाम प्रकरणाच्या पारदर्शीतेवर होतो. ही बाब प्रभावी आणि मजबूत न्यायपद्धतीच्या संकल्पनेला धक्का देणारी ठरू शकते, असा धोक्याचा इशारा उच्च न्यायालयाने दिला.खंडपीठाच्या अधिकार क्षेत्रातील प्रकरणे मुख्य पीठाकडे स्थानांतरित करताना संबंधित पक्षकारांच्या समस्या जाणून घेणे आवश्यक आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील नागरिकांच्या सुविधेसाठी नागपूर आणि औरंगाबाद येथे खंडपीठ निर्माण करण्यात आले. प्रकरणे स्थानांतरित केल्यास मुंबईत नव्याने वकील नेमावा लागतो. पक्षकारांना मुंबईत ये-जा करणेही परवडणारे नाही. मुंबईत प्रकरणांची गर्दी असल्याने संबंधित स्थानांतरित प्रकरण व्यवस्थित ऐकले जाईलच याची शाश्वती नाही, असे निकालात नमूद करण्यात आले. नक्षल समर्थक प्रा. जी.एन. साईबाबा याचा जामीन सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नाकारला होता. या संदर्भातील एक याचिका मुंबई मुख्य पीठाने परस्पर चालवून साईबाबाला जामीन मंजूर केला होता. यावर नागपूरचे वकील अ‍ॅड. अनिल किलोर आणि अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी मध्यस्थी करून परस्पर प्रकरणे स्थानांतरित करण्याच्या मुद्यावर आक्षेप घेतला होता. त्यावेळी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी राज्य सरकारतर्फे बाजू मांडताना असे सांगितले होते की, प्रकरणाच्या स्थानांतरणाच्या संदर्भात दिशानिर्देश तयार करण्यात येतील.प्रकरणांच्या स्थानांतरणाच्या मुद्यावर मुख्य न्यायमूर्तींनी वरिष्ठ पीठाचे गठन करावे, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. (प्रतिनिधी)