शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
6
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
7
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
8
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
9
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
10
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
11
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
12
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
13
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
14
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
15
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
16
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
17
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
18
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
19
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
20
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाची इमारत बांधायलाच पैसे नाहीत? २१८ लाखांचे काम १३९ लाखांत कसे पूर्ण होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 15:27 IST

Nagpur : गडचिरोली येथे जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत बांधण्यासाठी २१८.५४ लाख रुपयांची गरज असून विधी व न्याय विभागाने केवळ १३९.२९ लाख रुपये मंजूर केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
गडचिरोली येथे जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत बांधण्यासाठी २१८.५४ लाख रुपयांची गरज असून विधी व न्याय विभागाने केवळ १३९.२९ लाख रुपये मंजूर केले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही बाब लक्षात घेता एवढ्या कमी निधीमध्ये इमारतीचे काम कसे पूर्ण होणार, अशी विचारणा विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना केली. तसेच, यावर येत्या ८ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

संबंधित जनहित याचिकेवर न्यायमूर्तिद्वय अनिल पानसरे व निवेदिता मेहता यांच्यापुढे सुनावणी झाली. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रतिज्ञापत्र दाखल करून निधीच्या आकडेवारीकडे लक्ष वेधले. यावेळी चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचा मुद्दाही हाताळण्यात आला. चालू बिल थकल्यामुळे कंत्राटदाराने या इमारतीचे बांधकाम थांबवले आहे. परिणामी, न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला फटकारून बांधकाम मोजमापाची पुस्तिका सादर करण्याचे निर्देश दिले. याशिवाय, कामाचा निधी तातडीने वाटप केला नाही, म्हणून वित्त विभागाच्या सचिवांना स्पष्टीकरण मागितले आणि हा निधी येत्या ३१ मार्चपूर्वी वाटप करण्याचा आदेश दिला. न्यायालयातील पायाभूत सुविधांचा विकास रखडल्यास न्यायदान प्रक्रियेवर वाईट परिणाम होतो, असे न्यायालय म्हणाले.

हायकोर्टातील काम अपूर्णच

सार्वजनिक बांधकाम विभागाने उच्च न्यायालयातील विकासकामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही दिली होती. परंतु, या मुदतीत कामे पूर्ण करणे अशक्य असल्याची बाब लक्षात घेता विभागाने मुदत वाढवून मागितली. न्यायालयाने त्यावर नाराजी व्यक्त करून मुख्य अभियंत्यांना स्पष्टीकरण मागितले व विलंबाकरिता जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Court building funds insufficient; how will work complete?

Web Summary : Gadchiroli court building faces funding shortfall. High Court questions inadequate allocation, demands explanation. Chandrapur court construction stalled due to unpaid bills. High Court expresses concern over delayed infrastructure impacting justice delivery.
टॅग्स :nagpurनागपूरGadchiroliगडचिरोलीMONEYपैसा