शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

- तर केंद्र सरकारने २५ कोटी रुपये जमा करावेत  : हायकोर्टाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 11:04 PM

वर्धा ते सिंदखेड राजा या राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती व देखभालीचा कार्यक्रम येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्यात यावा. अन्यथा न्यायालयात २५ कोटी रुपये जमा करावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी केंद्र सरकारला दिला.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग दूरवस्थेचे प्रकरण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वर्धा ते सिंदखेड राजा या राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती व देखभालीचा कार्यक्रम येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्यात यावा. अन्यथा न्यायालयात २५ कोटी रुपये जमा करावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी केंद्र सरकारला दिला.यासंदर्भात अ‍ॅड. अरुण पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली असून त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, याचिकाकर्त्याचे वकील फिरदोस मिर्झा यांनी राष्ट्रीय महामार्गाची अधिसूचना जारी झाल्यानंतर त्या रोडच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी केंद्र सरकारची असते अशी माहिती न्यायालयाला दिली. न्यायालयाने ही बाब लक्षात घेत हा आदेश दिला. या याचिकेत अमरावती-मलकापूर रोडच्या दुरवस्थेचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. गेल्या तारखेला न्यायालयाने या रोडच्या कामाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली. त्या समितीचा अहवाल यायचा आहे. हे दोन्ही रोड खराब झाले असल्यामुळे अपघात होत आहेत. वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी, दोन्ही रोडच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर तर, महामार्ग प्राधिकरणतर्फे अ‍ॅड. अनिश कठाणे यांनी कामकाज पाहिले.अपघात झाल्यास अधिकारी जबाबदारयेणाऱ्या दिवसात या दोन्ही रोडवर अपघात झाल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवून त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी तंबी न्यायालयाने दिली. या रोडवरील अपघातांची आकडेवारी पोलिसांकडून मागवू असेदेखील न्यायालयाने सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयhighwayमहामार्गCentral Governmentकेंद्र सरकार