शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सुपारी चोरीतील आरोपींचा पर्दाफाश

By admin | Updated: February 12, 2015 02:28 IST

हितेंद्र नटवरलाल मेहता यांच्या स्मॉल फॅक्टरी एरियातील गोडाऊनमधून सुपारीच्या पाच लाखाच्या २५ बॅग पळविणाऱ्या टोळीचा लकडगंज ....

नागपूर : हितेंद्र नटवरलाल मेहता यांच्या स्मॉल फॅक्टरी एरियातील गोडाऊनमधून सुपारीच्या पाच लाखाच्या २५ बॅग पळविणाऱ्या टोळीचा लकडगंज पोलिसांनी पर्दाफाश करून आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लकडगंज पोलिसांनी आरोपी राजकुमार ठाकूराम माणिकपंच (शाहू) (३१) रा. डिप्टी सिग्नल झोपडपट्टी बाजार चौक यास ताब्यात घेतले. त्याच्या माहितीवरून हितेश नानकराम आसवानी (२८) रा. दत्तनगर, एनआयटी गार्डनसमोर, हेमंत रेखराम शाहू (३९) रा. लालगंज गुजरी हनुमान मंदिराजवळ, सुंदरलाल रेखराम शाहू (३२) डिप्टी सिग्नल झोपडपट्टी बाजार चौक, धर्मेंद्र रामजी मेश्राम (२५) डिप्टी सिग्नल झोपडपट्टी बाजार चौक, अमीन रसीद शेख (३१) आदिवासी प्रकाशनगर झोपडपट्टी यांना अटक केली. चौकशीदरम्यान आरोपी धर्मेंद्र रामजी मेश्राम याने दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यात वापरलेला ट्रक क्रमांक एमएच ३१, सीबी-४५३५ चा चालक अजय ऊर्फ उगेश बुद्धू पटेल (२८) रा. श्रावणनगर, आटाचक्कीजवळ नंदनवन यास अटक करण्यात आली. गुन्ह्यात एकुण १० लाखाचा माल जप्त करण्यात आला. आरोपी हितेश आसवानी हा इतवारी अनाज बाजारात दलाल असून आरोपी धर्मेंद्र मेश्राम हा फिर्यादीच्या गोडाऊनमध्ये हमालीचे काम करीत होता. धर्मेंद्रने चोरीची टीप आरोपी सुंदरलाल शाहू यांना दिली. त्याने साथीदारांना सोबत घेऊन गोडाऊनमध्ये चोरी केली होती. ही कारवाई पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. के. जयस्वाल, पोलीस निरीक्षक एस. डी. मडावी, सहायक पोलीस निरीक्षक एस डी. निकम, हवालदार अजय रोडे, राजेंद्र बघेल, प्रवीण गाणार, रत्नाकर मेश्राम, मनोज नेवारे, सतीश पांडे, दीपक कारोकर, राजेश डेकाटे, सुबोध खानोरकर यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)