शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
3
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
4
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
5
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
6
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
7
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
8
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
9
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
10
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
11
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
13
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
14
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
15
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
16
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
17
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
18
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
19
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
20
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबीयांचं कार्य महान; मध्य प्रदेशातील शेतकऱ्याचे नागपुरात अवयवदान

By सुमेध वाघमार | Updated: August 19, 2023 19:35 IST

मध्य प्रदेशातील छिंदवाडा सिवनी येथील गणेश सवाई (४४) त्या अवयवदात्याचे नाव.

नागपूर : मानवी जीव वाचविण्यासाठी अवयवदानाच्या अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. शेतकरी कुटुंबही अवयवदानासाठी पुढाकार घेऊ लागल्याने अवयव निकामी होऊन मृत्यूच्या दाडेत जगणाऱ्यांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. शनिवारी मध्यप्रदेशातील एका शेतकºयाचे नागपुरात अवयवदान झाले. यामुळे तिघांना नवे जीवन तर दोघांना दृष्टी मिळाली. 
    
मध्य प्रदेशातील छिंदवाडा सिवनी येथील गणेश सवाई (४४) त्या अवयवदात्याचे नाव. सवाई हे व्यवसायाने शेतकरी होते. शेतातील काम करून करून घरी परत येत असताना दुचाकीवरून तोल गेल्याने ते खाली पडले. त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. प्रथम उपचाराकरिता पांढूर्णा येते नेण्यात आले. परंतु प्रकृती खालवल्याने त्यांना १४ ऑगस्ट रोजी नागपूरच्या ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे’त  (एम्स) दाखल केले. तपासणीत मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याचे आढळून आले. डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांना तपासून ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत घोषीत केले. 

‘एम्स’चे अवयव प्रत्यारोपण समन्वयक प्रितम त्रिवेदी आणि प्राची खैरे यांनी सवाई यांच्या कुटुंबियांना अवयवदानासाठी समुपदेशन केले. पत्नी राधिका व मुलगा विशाल सवाई यांनी अवयवदानासाठी होकार दिला. याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटर’चे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. संजय कोलते व सचिव डॉ. राहुल सक्सेना यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात झोन समन्वयक दिनेश मंडपे यांनी ‘झेडटीसीसी’च्या यादीनुसार गरजू रुग्णांना दोन किडनी, लिव्हर आणि कॉर्निआचे दान केले.
 

टॅग्स :nagpurनागपूरMadhya Pradeshमध्य प्रदेशdoctorडॉक्टरAIIMS hospitalएम्स रुग्णालय