कर्मचाऱ्यांना पाच कोटी वितरित करण्याची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:19 IST2021-02-20T04:19:12+5:302021-02-20T04:19:12+5:30

नागपूर : गोंदिया येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाने स्वत:ची प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी वेतन व इतर आर्थिक दावे थकीत असलेल्या ...

Testimony to distribute Rs 5 crore to employees | कर्मचाऱ्यांना पाच कोटी वितरित करण्याची ग्वाही

कर्मचाऱ्यांना पाच कोटी वितरित करण्याची ग्वाही

नागपूर : गोंदिया येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाने स्वत:ची प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी वेतन व इतर आर्थिक दावे थकीत असलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने पाच कोटी रुपये वितरित करण्याची ग्वाही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. त्यामुळे न्यायालयाने गुरुवारी या प्रकरणावरील सुनावणी ५ मार्चपर्यंत तहकूब केली.

महाविद्यालयावर ९४ कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आर्थिक दाव्यांचे सुमारे २४ कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कर्मचाऱ्यांना गेल्या २० महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. तसेच हे महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय झाल्यामुळे त्यांना इतर आर्थिक लाभही देणे आहे. या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय नितीन जामदार व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. राम परसोडकर तर महाविद्यालयातर्फे ॲड. भानुदास कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Testimony to distribute Rs 5 crore to employees