शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वेची डिसेंबरपर्यंत चाचणी

By admin | Updated: January 5, 2017 02:12 IST

मेट्रो रेल्वे मिहान डेपो ते एअरपोर्ट मेट्रो स्थानकापर्यंत जमिनीवर धावणार आहे. या ५.६ कि़मी. लांबीच्या मार्गावर रुळ टाकण्यापूर्वीचे काम सुरू आहे.

बृजेश दीक्षित : मिहान ते विमानतळ स्थानक नागपूर : मेट्रो रेल्वे मिहान डेपो ते एअरपोर्ट मेट्रो स्थानकापर्यंत जमिनीवर धावणार आहे. या ५.६ कि़मी. लांबीच्या मार्गावर रुळ टाकण्यापूर्वीचे काम सुरू आहे. या कामाच्या पूर्णत्वानंतर मेट्रो रेल्वेची पहिली चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी हैदराबाद येथून तीन कोचचे दोन सेट मागविण्यात येणार आहे. त्याद्वारे प्रायोगिक तत्त्वावर डिसेंबरपर्यंत मेट्रो रेल्वेची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एनएमआरसीएल) व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. पत्रपरिषदेत प्रकल्प संचालक महेशकुमार, संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर, वित्त संचालक शिवमाथन आणि उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क व समन्वयक) शिरीष आपटे उपस्थित होते.(प्रतिनिधी) नागरिकांना मेट्रोची माहिती देणार दीक्षित यांनी मेट्रो रेल्वेच्या विकास कामांचा आढावा घेतला. सादरीकरणाद्वारे प्रस्तावित प्रकल्पाची माहिती दिली. प्रत्येकाने मेट्रोमध्ये बसून प्रवास करावा, अशी इच्छा आहे. मेट्रो येण्यापूर्वी प्रकल्पाची परिपूर्ण माहिती लोकांना करून देण्याचा संकल्प आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम संवाद साधण्याची इच्छा आहे. यावर्षी कंपनीसमोर अनेक आव्हाने असून, त्यावर मात करून पूर्ण करण्याचा संकल्प आहे. कोचच्या निर्मितीसाठी दोन वर्षे लागणार मेट्रो रेल्वेच्या चाचणीदरम्यान शिवणगाव मार्गावर सहा महिन्यांसाठी तात्पुरते स्थानक उभारण्यात येणार आहे. चाचणी संपल्यानंतर पाच व्यावसायिक फेऱ्या सुरू होतील. मेट्रो रेल्वेसाठी चीनची कंपनी कोच तयार करणार आहे. पण त्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागेल. तोपर्यंत वाट न पाहता रुळ टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हैदराबाद येथून भाड्याने आणलेल्या कोचद्वारे प्रायोगिक चाचणी करण्यात येईल. इंजिन व डबे अखंड राहतील. स्वयंचलित यंत्रणेने गाडीचे नियंत्रण करण्यात येणार आहे. गाडी केव्हा धावेल किंवा केव्हा थांबेल, यात मोटरमॅनची मुख्य भूमिका राहील. कस्तूरचंद पार्कवर माहिती केंद्र नागरिकांना प्रकल्पाची माहिती देण्यासाठी कस्तूरचंद पार्कच्या बाजूला माहिती केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रातून नागरिकांना प्रकल्पाची संपूर्ण माहिती देण्यात येईल. मनीषनगर पुलाला रेल्वेची मंजुरी अजनी चौक ते प्राईड हॉटेलपर्यंत डेबल डेकर पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. याच पुलावरून मनीषनगरपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी रेल्वे प्रशासनाने तात्पुरती परवानगी दिली आहे. मॉरिस कॉलेजपासून कडबी चौकापर्यंत भूमिगत मार्ग वाहतुकीवर पर्याय म्हणून मॉरिस कॉलेज ते कडबी चौकापर्यंत दोन कि़मी.चा ६८० कोटींच्या गुंतवणुकीतून चार पदरी भूमिगत मार्ग बनविण्याचा प्रस्ताव आहे. या मार्गाचा अहवाल राईट्स कंपनीने तयार केला असून, एनएचएआयकडे सोपविला आहे. त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. कारागृहालगत मेट्रो रेल्वे धावणार मेट्रा रेल्वे अजनी स्थानकापासून वर्धा रोडकडे वळणार आहे. त्यासाठी कारागृहाच्या जागेतून ४७० मीटरचा डीपी रस्ता तयार करण्यात येत आहे. त्या मार्गावरून मेट्रो रेल्वे धावणार आहे. स्थानिकांना रोजगार मिळणार केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या धोरणांतर्गत स्थानिकांना रोजगार देण्यात येणार आहे. सध्या कंत्राटदारांचे कर्मचारी कार्यरत असून काम पूर्ण झाल्यानंतर ते परत जातील. त्यानंतर मेट्रोच्या संचालनासाठी स्थानिकांची भरती करण्यात येणार आहे.