शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

विशेष परीक्षेने वाढविला ताण

By admin | Updated: August 18, 2014 00:39 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रवेशबंदी लावल्यानंतर नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी २८ आॅगस्टपासून विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे.

नागपूर विद्यापीठ : परीक्षा विभागातील अधिकारी, कर्मचारी हैराणनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रवेशबंदी लावल्यानंतर नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी २८ आॅगस्टपासून विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे.या परीक्षेच्या तयारीसाठी परीक्षा विभागातील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांना लावण्यात आले आहे. परंतु यामुळे नियमित निकाल व पुढील परीक्षांच्या तयारीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अगोदरच मनुष्यबळाची कमतरता असताना हा अतिरिक्त भार कसा काय सांभाळायचा, असा प्रश्न हैराण झालेले कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल अजूनही पूर्णपणे लागलेले नाहीत. अनेक महाविद्यालयांत प्रथम वर्षांत विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत, परंतु विद्यार्थ्यांची नामांकन नोंदणी हवी त्या प्रमाणात झालेली नाही. त्यातच विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या तसेच हिवाळी परीक्षा आॅक्टोबर महिन्यापासून सुरू होतील. याचे वेळापत्रक तयार करणे इत्यादी अनेक कामे पूर्णत्वास जायची आहे. अशा स्थितीतच हिवाळी परीक्षेचा अतिरिक्त ताण आल्याने कर्मचारी व अधिकारी हैराण आहेत. शिवाय या परीक्षेकडे सगळ्यांचेच लक्ष लागल्याने यात कुठलीही चूक होणे महागात पडू शकते याची जाणीव सर्वांनाच आहे. त्यामुळे नियमित काम सोडून यावर लक्ष केंद्रित करावे लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.यासंदर्भात परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी प्रशासनाने काढलेल्या ‘गप्प बसा’ या परिपत्रकाचा दाखला देत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)