शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात घरमालकांकडून भाडेकरु विद्यार्थ्यांवर पैशांसाठी दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 07:00 IST

अनेक घरमालक व खासगी वसतीगृहचालक चक्क भाड्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींवर भाड्यासाठी दबाव आणत आहेत. असे न केल्यास खोल्यांतून सामान घेऊन जा असे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देचक्क खोल्यांना लावले जात आहेत दुसरे कुलुप केंद्राच्या नियमांचे पालन नाही, विद्यार्थी तणावात

योगेश पांडेनागपूर : कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. यामुळे बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना तातडीने खोल्यांमध्ये सामान ठेवूनच गावी परतावे लागले. मात्र आता बरेच विद्यार्थी-विद्यार्थिनी वेगळ्याच संकटात सापडले आहेत. अनेक घरमालक व खासगी वसतीगृहचालक चक्क भाड्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींवर भाड्यासाठी दबाव आणत आहेत. असे न केल्यास खोल्यांतून सामान घेऊन जा असे सांगितले जात आहे. नागपुरहून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये यामुळे तणाव निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या नियमावलीत स्पष्ट उल्लेख असतानादेखील घरमालक मनमानी करुन भाडे मागण्याचा प्रकार करत असल्याचे चित्र आहे.देशात लॉकडाऊन जारी झाल्यानंतर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयातर्फे विशेष नियमावली जारी करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या कालावधीत भाडेकरुंवर भाडे देण्यासाठी दबाव आणू नये व खोली रिकामी करण्यासाठी तगादा लावू नये असे यात स्पष्टपणे नमूद होते. नागपूर शहरात धरमपेठ, गांधीनगर, शिवाजीनगर, शंकरनगर, रामगर या भागात अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी भाड्याने खोली घेऊन अथवा खाजगी वसतीगृहांमध्ये राहतात. उन्हाळी परीक्षांसाठी परत यायचे असल्याने व तातडीने रवाना व्हायचे असल्याने बहुतांश जणांनी आपले सामान खोलीवरच ठेवले. मात्र आता पूर्ण भाडे द्या अथवा पूर्ण सामान घेऊन जा असा तगादा घरमालकांनी लावला आहे.मोदी, प्रशासनाला सांगायला काय होते‘लोकमत’कडे यासंदर्भात काही विद्यार्थिनींनी आपली समस्या मांडली. शिवाजीनगर स्केटिंग मैदानाजवळच असलेल्या एका घरात काही विद्यार्थिनी भाड्याने राहतात. या सर्व विद्यार्थिनी आपल्या गावी गेल्या असताना त्यांच्या घरमालकाने भाडे देण्यासाठी दबाव टाकणे सुरू केले आहे. बहुतांश विद्यार्थिनींनी अर्धे भाडेदेखील दिले. मात्र पूर्ण भाडे द्या अन्यथा लगेच खोली रिकामी करा अशी भूमिका घरमालकाने घेतली आहे. यासंदर्भात त्यांना पालकांनी विचारणा केली असता पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी किंवा प्रशासनाला नियम बनवायला काय होते. ते थोडी इथे येऊन परिस्थिती पाहणार आहेत. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पूर्ण भाडे द्या’, असे उत्तर त्यांना घरमालकांकडून देण्यात आले. आम्ही घरमालकाला अर्धे भाडे देण्याची तयारी दाखविली आहे. आमचे केवळ सामानच तिथे आहे. परीक्षांसाठी आम्हाला परत यायचेच आहे. अशा स्थितीत आम्ही काय करावे असा प्रश्न विद्यार्थिनींनी उपस्थित केला आहे.भाडे द्या अथवा सामान घेऊन जायासंदर्भात संबंधित घरमालक विजयराव देवगडे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क केला असता जर कुणी आमच्या खोल्यांमध्ये राहत असेल तर त्यांनी भाडे देणे अपेक्षित आहे. त्यांनी भाडे द्यावे अथवा सामान घेऊन जावे, असे त्यांनी स्पष्ट केले.काय म्हणतात नियमलॉकडाऊनच्या कालावधीत घरमालकांनी भाडेकरुन भाडे देण्यासाठी दबाव टाकू नये. शिवाय विद्यार्थ्यांना खोली रिकामी करण्यासाठी सांगू नये. जर नियमांचा भंग झाला संबंधित राज्य शासनाच्या यंत्रणेने व पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, असे गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस