शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी संघाची धाव

By admin | Updated: March 18, 2016 03:17 IST

उन्हाळ््याच्या तोंडावर राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संघाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

संघश्रेष्ठींचे निर्देश: दुष्काळ निवारणासाठी कायमस्वरूपी तोडग्याचा शोध सुरूयोगेश पांडे  नागपूरउन्हाळ््याच्या तोंडावर राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संघाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. संघाच्या तज्ज्ञ स्वयंसेवकांची एक ‘टीम’च यावर सखोल अभ्यास करत आहे. शिवाय यंदाच्या दुष्काळात ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध प्रकल्पदेखील राबविण्यात येणार असून संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडून यावर देखरेख ठेवण्यात येणार असल्याची माहिती संघ मुख्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.राज्यात सातत्याने काही वर्षांपासून दुष्काळ पडतो आहे. यंदादेखील तशीच परिस्थिती असून पावसाच्या कमतरतेमुळे मराठवाडा तसेच विदर्भात पाण्याची प्रचंड कमतरता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी तर जलाशये आतापासूनच कोरडी पडायला सुरुवात झाली आहे. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी गावागावांमध्ये जाण्याचा संघातर्फे निर्णय घेण्यात आला आहे. तात्पुरत्या उपाययोजनांसाठी संघ आणि संघ परिवारातील विविध संघटनांनी नोव्हेंबर महिन्यापासूनच कंबर कसली आहे. मराठवाडा व विदर्भातील दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. शिवाय दुष्काळग्रस्त भागात चाऱ्यांची गंभीर समस्या निर्माण झाली असल्याने उन्हाळ््यात मराठवाड्यामध्ये ५० हून अधिक चारा छावण्यांच्या माध्यमातून पशूखाद्य पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.परंतु भविष्याचा विचार करून संघाच्या जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार दुष्काळी गावांचे तज्ज्ञांच्या ‘टीम’कडून सर्वेक्षण सुरू आहे. शिवाय येथील भूजल पातळी वाढविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, पाण्याचा साठा कसा वाढेल व नवीन जलस्त्रोत कसे निर्माण करता येतील यावर या स्वयंसेवकांकडून अभ्यास सुरू आहे. शिवाय लहान बंधारे व शेततळी बांधणे, जुन्या जलस्रोतांचे पुनरुज्जीविकरण यावरदेखील भर देण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.