शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
2
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
3
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
4
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
5
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
6
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
7
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
8
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
9
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
10
VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
11
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
12
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
13
Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक
14
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
15
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
16
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
17
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
18
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
19
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
20
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या पगाराचे विड्रॉल नाहीत

By admin | Updated: May 18, 2014 01:02 IST

भारतीय रिझर्व्ह बँकेने नागपूर जिल्हा सहकारी बँकेवर अवसायक नियुक्तीचे आदेश सहकार आयुक्तांना दिल्यानंतर बँकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बंध आले आहेत.

जिल्हा बँकेवर कारवाई : बँक अपील करणार

नागपूर : भारतीय रिझर्व्ह बँकेने नागपूर जिल्हा सहकारी बँकेवर अवसायक नियुक्तीचे आदेश सहकार आयुक्तांना दिल्यानंतर बँकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे शिक्षकांचे एप्रिल महिन्याचे पगार आता विड्रॉल होणार नाही. शिक्षकांचे पगाराचे ४२ कोटी रुपये बँकेत जमा आहेत. या वेळी शिक्षण खात्याकडून पगाराचे धनादेश बँकेत उशिरा आले. धनादेश बँकेत जमा झाल्यानंतर दोनच दिवसात बँकेवर कारवाई झाली. मे महिन्यात शिक्षकांना सुट्या लागल्याने त्यांनीही पगाराचे पैसे विड्रॉल केले नाहीत. या सर्व घडामोडींमुळे आता शिक्षक संघटनांची ओरड पुन्हा सुरू झाली आहे. युनियन बँकेतून पगार करण्याची त्यांची मागणी जोर धरू लागली आहे. युनियन बँकेत सर्वच शिक्षकांचे खाते उघडले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे जिल्हा बँकेतूनच पगार सुरू होते. पण आता कारवाईमुळे शिक्षकांचे पगार संकटात आले आहेत. बँक सोमवारी अपील करणार रिझर्व्ह बँकेच्या अवसायक नियुक्तीच्या आदेशामुळे जिल्हा बँकेचे आर्थिक व्यवहार बंद आहेत. व्यवहार बंदीचे आदेश शिथिल करावेत, यासाठी जिल्हा बँक सोमवारी केंद्र शासनाच्या वित्त विभागाकडे अपील करणार आहे. अपिलासह शासनाचे आर्थिक मदतीचे आणि सहकार आयुक्तांचे पत्र जोडणार आहे. यावर वित्त विभाग एक महिन्याची मुदत देईल, अशी अपेक्षा आहे. या एक महिन्याच्या काळात शासनाची मदत मिळाल्यानंतर बँकेचे व्यवहार सुरळीत होण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांना कर्जवाटप नाही यंदा आर्थिक तरलतेअभावी बँक शेतकर्‍यांना कर्जवाटप करू शकत नाही. बँकांच्या परवान्याचे प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने नामंजूर केले आहेत. यासंदर्भात १६ मे रोजीच पणन विभागाने सहकार आयुक्त व निबंधकांना पत्र पाठविले आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या ९ मे २०१४ च्या आदेशाविरुद्ध केंद्र सरकारकडे अपील दाखल करण्याबाबत बँकांचे प्रशासक यांना आपल्या स्तरावरून त्वरित निर्देश देण्यात यावे व त्याबाबतच अहवाल सरकारकडे तत्काळ सादर करावा, अशी विनंती सहकार विभागाच्या विशेष कार्य अधिकार्‍यांनी सहकार आयुक्तांना केली आहे.