शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
4
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
5
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
6
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
7
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
8
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
9
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
10
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
11
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
12
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
13
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
14
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
15
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
16
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
17
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
18
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
19
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
20
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
Daily Top 2Weekly Top 5

कधीही शाळेत शिकविण्यासाठी न गेलेल्या महिलेचा शालार्थ आयडी, कागदोपत्री दाखविले शिक्षक

By योगेश पांडे | Updated: February 27, 2026 20:46 IST

शालार्थ आयडी घोटाळ्यात आणखी एक गुन्हा दाखल : शाळा व्यवस्थापनावर संशयाची सुई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
आजवर कधीही शाळेत शिकविण्यासाठी न गेलेल्या महिलेला कागदोपत्री शिक्षक दाखविण्यात आले. तसेच तिचा शालार्थ आयडीदेखील बनविण्यात आला. शालार्थ आयडी प्रकरणातील तपासात हा आणखी एक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्यांची संख्या २७ इतकी झाली आहे. सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

ऑनलाईन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर करून अनेक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. या प्रकरणात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी रविंद्र ज्ञानेश्वर पाटील यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास राज्यपातळीवरील विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. तपासादरम्यान कान्होलाबारा येथील चित्रलेखादेवी भोसले उच्च प्राथमिक शाळा येथे कागदोपत्री सहायक शिक्षक या पदावर कार्यरत असलेल्या श्वेता नरेश नगराळेचे (४०) नाव समोर आले. नगराळेने कधीही शाळेत जाऊन शिकविलेले नाही. मात्र मुख्याध्यापक, तत्कालिन शिक्षणाधिकारी, उपसंचालक व वेतन अधीक्षकासोबत संगनमत करून नगराळेचे शालार्थ आयडी तयार करण्यात आले. त्यानंतर वेतन सुरू करण्यात आले. सप्टेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत नगराळेला वेतनापोटी ५.६५ लाख रुपये देण्यात आले. हा गैरप्रकार समोर आल्यावर नगराळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, इतके दिवस एखादी शिक्षिका शाळेत येत नाही व शाळा व्यवस्थापनाकडून काहीच कारवाई होत नाही ही बाबदेखील अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे.

अटक झालेल्या आरोपींची संख्या २७

शालार्थ आयडी घोटाळ्यातील अटकेतील आरोपींची संख्या आता एकूण २७ इतकी झाली आहे. यात तीन शिक्षण उपसंचालक, चार शिक्षणाधिकारी, एक वेतन अधीक्षक, चार मुख्याध्यापक, दोन शाळा संचालक, चार सहायक शिक्षक, नऊ लिपीकांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Woman never taught, yet shown as teacher with salary ID.

Web Summary : A woman was falsely documented as a teacher and given a salary ID without ever teaching. Police filed a case against her in the Shalarath ID scam, bringing the total arrests to 27. The fraud involved creating fake IDs and siphoning salaries.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीEducationशिक्षणTeacherशिक्षकnagpurनागपूर