शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची गंभीर दखल घ्या

By admin | Updated: February 13, 2016 02:56 IST

सभागृहात सदस्य अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करीत आहेत. यातील तथ्य जाणून घेण्याची गरज आहे.

महापौरांचे निर्देश : फोर- जी केबलसाठी अवैध खोदकामनागपूर : सभागृहात सदस्य अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करीत आहेत. यातील तथ्य जाणून घेण्याची गरज आहे. फोर- जी केबल प्रकरणात अधिकाऱ्यांनी रिलायन्स व व्होडाफोन अशा कंपन्यांना लाभ होईल, असे निर्णय घेतल्याचा सदस्यांचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी करून सभागृहात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौर प्रवीण दटके यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिले.भाजपचे सदस्य प्रवीण भिसीकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. रिलायन्स कंपनीने फोर- जी केबलसाठी अवैध खोदकाम केल्याचे निदर्शनास आणून या प्रकरणात अधिकारी सहभागी असल्याचा आरोप केला. २०१३ ते २०१६ या कालावधीत शहरात रिलायन्स कंपनीने केबल टाकण्यासाठी ४६९.९३ किलोमीटर नियमबाह्य खोदकाम केले. परंतु ५०३ मीटरच्याच कामावर दंड आकारण्यात आला. हा कमी असून यात महापालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. कंपनीने मोठ्या प्रमाणात खोदकाम केले असतानाही अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. अधिकाऱ्यांना प्रति किलोमीटरप्रमाणे कमिशन मिळत असल्याचा आरोप केला. मात्र संबधित अधिकाऱ्यांनी याचे खंडन केले. सत्तापक्षातील सदस्य अशा प्रकारचे गंभीर आरोप करीत आहेत. परंतु याची दखल घेतली जात नाही. यावरून विरोधी सदस्यांना किती त्रास होत असेल. रस्त्यावर नियमबाह्य खोदकाम करण्यात मोबाईल कंपन्याच नाही तर इतर कंपन्यासुद्धा तितक्याच जबाबदार असल्याचे विरोधीपक्षनेते विकास ठाकरे यांनी निदर्शनास आणले. (प्रतिनिधी)खांबावरील केबल हटविणाररिलायन्स कंपनीने शहरात खांबावर टाकलेले अवैध ओव्हर हेड केबल सात दिवसात हटविण्यात येईल, कंपनीने केबल हटविले नाही तर महापालिकेचे कर्मचारी ते काढतील, यासाठी लागणारा खर्च कंपनीकडून वसूल केला जाईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. डक्ट असतानाही खोदकामाची परवानगी कोणत्या अधिकाऱ्यांनी दिली, याची चौकशी केली जाईल. या प्रकरणात अधिकारी दोषी आढळल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल. दोषी न आढळल्यास यात सुधारणा केल्या जातील. तत्कालीन आयुक्तांनी डक्ट संदर्भात १२ कोटींचा दंड ठोठावला होता. परंतु याची वसुली का झाली नाही, याचाही शोध घेतला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. ४९ किलोमीटरचे डक्टींग शिल्लक आहे. ते तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.