शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील शवागारांचा आदर्श घ्या - हायकोर्ट

By admin | Updated: May 9, 2014 00:13 IST

नागपूर : गोव्यातील शवागारांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील शवागारांमध्ये सुधारणा करण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला केली आहे.

नागपूर : गोव्यातील शवागारांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील शवागारांमध्ये सुधारणा करण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला केली आहे. तसेच शासनाला यासंदर्भात माहिती घेण्यास सांगून, संबंधित याचिकेवरील सुनावणी उन्हाळी सुट्यानंतर निश्चित केली आहे. सहयोग ट्रस्टने ही जनहित याचिका दाखल केली आहे. शवागारांत उंदीर, घुस, मुंगूस अशा कुरतडणार्‍या प्राण्यांचा मुक्त संचार असतो. यामुळे अनेकदा शव कुरतडण्याच्या घटना घडतात.

ही मनुष्य देहाची विटंबना असून, हे थांबविण्यासाठी शासनाने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. सहयोग ट्रस्टने शवागारांचे निरीक्षण करून अहवाल सादर केला आहे. त्यात शवागार व शवविच्छेदन कक्षाच्या सुधारणेबाबत अनेक उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. या ठिकाणी कार्य करणार्‍यांना ग्लोव्हज, मास्क, अ‍ॅप्रॉन व अन्य आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, कर्मचार्‍यांना वेळोवेळी प्रशिक्षण द्यावे, शवविच्छेदनासाठी आधुनिक अवजार उपलब्ध करून देण्यात यावे, शवविच्छेदन कक्षात तक्रार पेटी, कचरापेटी व चौकशी खिडकी असावी, इत्यादी सूचनांचा अहवालात समावेश आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. स्मिता सिंगलकर यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)