शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ताजाबाद

By admin | Updated: November 8, 2015 03:08 IST

हजरत बाबा ताजुद्दीन या महान संताच्या वास्तव्याने नागपूरनगरी पावन झाली आहे़ ताजुद्दीन बाबा मुस्लीम धर्माचे असले तरी ...

मंगेश व्यवहारे नागपूरहजरत बाबा ताजुद्दीन या महान संताच्या वास्तव्याने नागपूरनगरी पावन झाली आहे़ ताजुद्दीन बाबा मुस्लीम धर्माचे असले तरी त्यांच्यावर श्रद्धा ठेवणारा भाविक हा सर्व धर्माचा आहे. सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या बाबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेले ताजाबाद शरीफ या तीर्थस्थळात आजही बाबांची शिकवण जोपासली जात आहे. ताजाबादच्या देखभालीसाठी बनविण्यात आलेल्या हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टमध्येही सर्व धर्मीयांचा समावेश दिसतो. भाविकांना नैतिक व आध्यात्मिक ऊर्जा पुरविणाऱ्या या स्थळाची कीर्ती जगभर पसरली आहे आणि म्हणूनच बाबांना मानणारा त्यांचा भक्त समुदाय जगाच्या कानाकोपऱ्यातून ताजाबाद येथे येतो आणि बाबांच्या चरणी नतमस्तक होतो़ शहरात मोठ्या ताजाबादपासून तर छोट्या ताजाबादपर्यंत, ग्रामीण भागात कामठीपासून वाकीपर्यंत सर्वत्र बाबांची कीर्ती दुमदुमत असते़ ताजुद्दीन बाबांचा जन्म नागपूरजवळच्या कामठी येथे झाला़ कामठीतीलच एका मदरशात बाबांनी शिक्षण घेतले. बाबांना नेहमी एकांत प्रिय असायचा़ या एकांतात ते अल्लाहची आराधना करायचे व समग्र विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना करायचे़ बाबांनी सेनेतही नोकरी केली. परंतु सत्कर्मासाठी मला थेट देवाने पाठविले आहे, असे सेना अधिकाऱ्याला सांगून एक साधा कपडा अंगाला लपेटून ते पुन्हा आराधनेत मग्न झाले़पुढे वेगवेगळ्या माध्यमातून बाबांचा साक्षात्कार भाविकांना झाला. ताजुद्दीन बाबांना मानणारा भाविक हा कुठल्याही एका जाती वा धर्माचा नाही़ सर्व जाती, पंथ, संप्रदायात बाबांचे अनुयायी आहेत़ त्याचे कारण बाबांनी दिलेली एकात्मतेची शिकवण आहे़ बाबा जन्माने मुस्लीम होते़ परंतु त्यांच्या दरबारात येणाऱ्या कुठल्याही भक्ताला त्यांनी कधी त्याची जात विचारली नाही़ जो कोणती समस्या घेऊन तो भाविक यायचा ती समस्या कशी सोडवता येईल, याचाच विचार बाबा करायचे़ हे करताना त्यांनी कधी आपला धर्म कुणावर लादला, असे अजिबात झाले नाही़ भाविकाच्या धर्माचा पूर्ण सन्मान बाळगून बाबांनी त्याच्या समस्येचे निराकरण केले़ म्हणूनच आज बाबांच्या सर्व दरबारात सर्व समाजाचे भाविक मोठ्या विश्वासाने माथा टेकवत असतात़ बाबांच्या ताजाबाद येथील दर्ग्याची वाटचाल आजही बाबांच्या विचारांवर सुरू आहे. या दर्ग्याचे संचालन करण्यासाठी हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट क ार्यरत आहे. ट्रस्टमध्ये सर्व धर्माच्या लोकांना प्रतिनिधित्व दिले आहे. ट्रस्टचे क ोषाध्यक्ष ख्रिश्चन समाजाचे आहेत. मोहब्बतसिंग तुली या ट्रस्टवर अध्यक्ष म्हणून राहिले आहे. माजी मंत्री अनिस अहमद या संस्थेचे अध्यक्ष असताना सरदार हरमेंदरसिंग अहलुवालिया हे सचिव तर रमेश पवार हे क ोषाध्यक्ष राहिले आहेत. बाबांचा ताजाबादच नाही तर वाकी, सक्करदरा येथेही दर्ग्याचे संचालन हिंदू समाजाकडून होत आहे.