शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

ई-कचऱ्याच्या लिलावाला स्थगिती

By admin | Updated: May 27, 2015 02:34 IST

कार्यालयातील जुने संगणक, प्रिन्टर, स्कॅनर व टोनर या साहित्याचा महापालिकेच्या समान्य प्रशासन विभागाने ई-कचऱ्यात समावेश करून ...

नागपूर : कार्यालयातील जुने संगणक, प्रिन्टर, स्कॅनर व टोनर या साहित्याचा महापालिकेच्या समान्य प्रशासन विभागाने ई-कचऱ्यात समावेश करून त्याची कवडीमोल भावाने विक्री करण्याची तयारी केली होती. यासाठी स्थायी समितीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु‘लोकमत’ ने या संदर्भातील घोटाळा पुढे आणल्याने स्थायी समितीने ई-कचऱ्याच्या लिलावाला स्थगिती देण्याचा निर्णय मंगळवारच्या बैठकीत घेतला. जुने संगणक, प्रिन्टर, स्कॅनर व टोनर या साहित्याचा ई-कचऱ्यात समावेश करून ९४४८२ रुपयाला विक ण्याचे ठरविले होते. हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. साहित्याचे बाजारमूल्य अधिक असल्याने लिलावाला स्थगिती दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी दिली. अतिरिक्त उपायुक्त यांच्या अध्यक्षतेत तीन सदस्यीय समिती गठित करण्याचे निर्देश देण्यात आले. यात समितीच्या दोन सदस्यांचा समावेश राहणार आहे. ही समिती या प्रकरणाची चौकशी करून प्रत्येक साहित्याची बाजारभावानुसार किंमत निश्चित करणार आहे. समितीच्या अहवालानंतर लिलावाचा निर्णय घेतला जाणार आहे. ई-कचऱ्याचे मूल्यांकन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नॅशनल इन्फारमेटीक्स सेंटर (एनआयसी)यांना विनंती केली होती. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने मनपाने सरकारी मूल्यांककाची मदत घेतली. (प्रतिनिधी)पाच वर्षांनी होतो लिलावमनपा प्रशासनाकडून नवीन साहित्य खरेदीचा प्रस्ताव येतो. त्यानुसार लाखो रुपयाची उपकरणे खरेदी केली जातात. परंतु ई -कचऱ्याचे दर्शविण्यात आलेले संभाव्य मूल्य फारच कमी त्यामुळे फेरमूल्यांकनाचे निर्देश दिल्याची माहिती रमेश सिंगारे यांनी दिली. अशा स्वरूपाचा लिलाव दर पाच वर्षांनी केला जातो. त्यामुळे हा प्रस्ताव समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.