निलंबित काँग्रेस शहराध्यक्षांचे प्रदेशाध्यक्षांना आव्हान

By Admin | Updated: May 23, 2014 01:12 IST2014-05-23T01:12:32+5:302014-05-23T01:12:32+5:30

लोकसभा निवडणुकीत देशभरातील आणि राज्यातील दारूण पराभवाला सामोरे जाणार्‍या काँग्रेस पक्षाला राज्यात आता न्यायालयापुढेही जाण्याची पाळी आली आहे. चंद्रपुरातील काँग्रेसचे निलंबित

Suspended Congress Challenge City President's State President | निलंबित काँग्रेस शहराध्यक्षांचे प्रदेशाध्यक्षांना आव्हान

निलंबित काँग्रेस शहराध्यक्षांचे प्रदेशाध्यक्षांना आव्हान

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत देशभरातील आणि राज्यातील दारूण पराभवाला सामोरे जाणार्‍या काँग्रेस पक्षाला राज्यात आता न्यायालयापुढेही जाण्याची पाळी आली आहे. चंद्रपुरातील काँग्रेसचे निलंबित शहर जिल्हाध्यक्ष गजानन गावंडे गुरूजी यांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना निलंबनाच्या मुद्यावरून न्यायालयात आव्हान दिले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष गजानन गावंडे, बल्लारपूर तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, चंद्रपूरच्या महापौर संगीता अमृतकर, स्थायी समिती सभापती रामू तिवारी, बल्लारपूरच्या नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी, चंद्रपूरचे नगरसेवक अशोक नागापुरे, प्रविण पडवेकर, उषा धांडे या आठ जणांवर ६ एप्रिलला पक्षाने निलंबनाची कारवाई केली होती. महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने हे पत्र निघाले होते. ही निलंबनाची प्रक्रिया पक्षाच्या घटनेला धरून नसल्याने ती रद्दबादल ठरविण्यात यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयापुढे केली आहे. माणिकराव ठाकरे यांच्यासोबतच अ‍ॅड. गणेश पाटील आणि नवनियुक्त चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर यांनाही गावंडे यांनी न्यायालयात खेचले आहे. चंद्रपुरातील चवथ्या सहाय्यक दिवाणी न्यायालयात गजानन गावंडे यांनी दाखल केलेल्या या याचिकेमध्ये पक्षाच्या घटनेतील तरतुदींचा संदर्भ दिला आहे. त्यानुसार, पक्षश्रेष्ठीकडे दाद मागितल्यावर निर्णय होत नाही, तोवर संबधित पदावर नवीन नियुक्ती केली जाऊ शकत नाही, अशी तरतुद असल्याचे गावंडे यांनी नमुद केले आहे. प्रत्यक्षात या आठही जणांचे निलंबन करण्यापूर्वी घटनेतील एकाही तरतुदीचे पालन झाले नाही. अद्याप एकालाही नोटीस मिळाल्या नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. तरीही परस्पर निर्णय घेऊन प्रदेश कार्यकारिणीने नंदू नागरकर यांची नियुक्ती केली. ही बाब पक्ष घटनेच्या विरोधात आहे. त्यामुळे सर्वांचे निलंबन मागे घ्यावे, आपणाला पक्षातील मुळ पदावर कायम ठेवावे आणि नंदू नागरकर यांची नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणी न्यायालयात काल २१ मे रोजी पहिली तारीख होती. मात्र न्यायाधिश रजेवर असल्याने ९ जून ही पुढची तारीख मिळाली आहे. गावंडे याचे वकीलपत्र अ‍ॅड. पुरूषोत्तम सातपुते यांनी, तर नवनियुक्त शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर यांचे वकिलपत्र अ‍ॅड. अविनाश भांडारकर यांनी स्विकारले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Suspended Congress Challenge City President's State President