उपराजधानीत पुन्हा हत्या

By Admin | Updated: November 22, 2015 02:58 IST2015-11-22T02:58:57+5:302015-11-22T02:58:57+5:30

नंदनवनमधील महिलेच्या निर्घृण हत्येच्या वृत्ताची शाई वाळते न वाळते तोच यशोधरानगरातही एका तरुण लेडीज टेलरची हत्या झाल्याचे उघडकीस आल्यामुळे शहरभर खळबळ उडाली आहे.

Supposed to be murdered again | उपराजधानीत पुन्हा हत्या

उपराजधानीत पुन्हा हत्या

टेलरचा कैचीने गळा कापला : पोत्यात मृतदेह लपवून आरोपीचे पलायन
नागपूर : नंदनवनमधील महिलेच्या निर्घृण हत्येच्या वृत्ताची शाई वाळते न वाळते तोच यशोधरानगरातही एका तरुण लेडीज टेलरची हत्या झाल्याचे उघडकीस आल्यामुळे शहरभर खळबळ उडाली आहे. अकरम नसिम अहमद मलिक (वय २७) असे मृताचे नाव आहे.
अकरम लेडिज टेलर होता. तो आईवडिलांपासून वेगळा योगी अरविंद नगरात भाड्याच्या खोलीत राहात होता. त्याने प्रवेशनगरात सलवार सूटचा कारखाना सुरू केला होता. काम वाढल्याने त्याने कोलकाता येथून ८ ते १० कारागीरही बोलावले होते. सलवार सूटवर नक्षीकाम (डिझाईन) करण्याचे काम हे कारागीर करीत होते. अकरम नेहमीप्रमाणे गुरुवारी दुपारी जेवण करून कारखान्यात गेला. रात्र झाली तरी तो परतला नाही. त्याचा मोबाईलही बंद होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या पत्नीने आपल्या सासरच्या मंडळीकडे अकरमबाबत विचारणा केली. तो तिकडेही आला नसल्याचे स्पष्ट झाले.

कारखान्याला होते कुलूप
उपराजधानीत पुन्हा हत्या

नागपूर : कारखान्याकडेही नातेवाईक गेले. बाहेरून कारखान्याला कुलूप दिसल्याने ते मागे फिरले. दरम्यान, शनिवारी सकाळी दीराला बोलवून अकरमची पत्नी खुशनुमा बानो (वय २३) हिने कारखान्याकडे धाव घेतली. बाहेरून कारखान्याच्या दाराला कुलूप होते. मात्र, आतून तीव्र दुर्गंध येत असल्यामुळे तिने पोलिसांना माहिती दिली. यशोधरानगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. कारखान्याच्या दाराचे कुलूप तोडून आतमध्ये पोलीस पोहचले. आतमध्ये एका प्लास्टिकच्या पोत्यात (बोरीत) अकरमचा मृतदेह आढळला. त्याच्या गळ्यावर घाव होते. बाजूलाच रक्ताने माखलेली कैची होती. ही माहिती कळताच उपायुक्त अभिनाशकुमार, ठाणेदार मुजावर, पीएसआय शेजूळ घटनास्थळी पोहचले. (प्रतिनिधी)

Web Title: Supposed to be murdered again