शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलित चालतात एकाच क्रमांकाच्या दोन सुमो!

By admin | Updated: October 19, 2014 00:55 IST

एका जिल्ह्यात एकाच क्रमांकाची दोन वाहने असणे शक्यच नाही. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील सास्ती वेकोलि एरियाच्या स्टोअर्सच्या सेवेत एकाच क्रमांकाच्या दोन टाटा सुमो असल्याचा धक्कादायक प्रकार

प्रकरण दाबण्याचा प्रयत्न : वेकोलितील साहित्याच्या तस्करीसाठी होत असण्याची शक्यताचंद्रपूर : एका जिल्ह्यात एकाच क्रमांकाची दोन वाहने असणे शक्यच नाही. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील सास्ती वेकोलि एरियाच्या स्टोअर्सच्या सेवेत एकाच क्रमांकाच्या दोन टाटा सुमो असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’च्या निदर्शनास आला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच हा प्रकार उघडकीस आला असला तरी हे प्रकरण दाबण्यासाठी वेकोलिच्या व्यवस्थापनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या विषयावर अवाक्षरही बोलायला कुणी तयार नसल्याने परिवहन विभाग आणि पोलीस विभागानेच यात पुढाकार घेण्याची गरज आहे.राजुरा तालुक्यातील सास्ती वेकोलि एरियामध्ये काही वाहने भाडेतत्वावर घेण्यात आली आहेत. अशा वाहनांचा क्रमांक त्याच प्रकारच्या वाहनासाठी वापरून गैरप्रकार करण्याचा आणि वेकोलिच्या कोट्यवधी रूपयांच्या साहित्यांची तस्करी अशा वाहनांमधून करण्यासाठी योजलेली ही युक्ती असावी, असा अंदाज प्रथमदर्शनी व्यक्त होत आहे.दोन दिवसांपूर्वी सास्ती वेकोलि एरिया स्टोअर्स परिसरात एमएच ३४, एम-९७७८ या क्रमांकाच्या दोन टाटा सुमो अगदी जवळजवळ उभ्या असल्याचे आढळून आले. या दोन्ही वाहनांचा रंग पांढरा होता. एवढेच नाही तर या दोन्ही वाहनात कमालिचे साम्य होते. आॅल इंडिया परमिट क्रमांक असलेल्या या दोन्ही वाहनांच्या नंबर प्लेट पिवळ्या रंगाच्या होत्या. महत्वाचे म्हणजे दोन्ही वाहनांच्या नंबर प्लेटवरील अक्षरेही अगदी सारखी होती. आणखी महत्वाचे म्हणजे, एका टाटा सुमोमध्ये सर्वसाधारण वाहनात असतात तशा चालकाच्या मागे प्रवाशी शिटा होत्या तर, दुसऱ्या वाहनात मात्र या शिटाच नव्हत्या. ही जागा पूर्णत: रिकामी होती. एकाच क्रमांकाची दोन्ही वाहने बघून तेथील सुरक्षा रक्षकही क्षणभर चक्रावला. त्याने या दोन्ही सुमो अडविल्या. या संदर्भात वरीष्ठांकडे तक्रारही केली. मात्र पुढे काय झाले, याचा पत्ता कुणालाच नाही.हे प्रकरण लोकमतच्या हाती येताच याचा छडा लावण्यासाठी ‘लोकमत’ चमू आज शनिवारी दिवसभर या परिसरात होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच्या घटनाक्रमाबद्दल कुणीही वाच्यता केली नाही. असा प्रकार घडलाच नाही, असे सांगून सर्वांनीच कानावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, संबंधित क्रमांकाची एक टाटा सुमो आज दुपारी एरिया स्टोअर्ससमोर काही काळ उभी होती. मात्र या सुमोतील सर्व शिटा व्यवस्थीत होत्या. या सुमोसंदर्भात लोकमत चमूने अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, ते वेकोलिचेच वाहन असल्याचे सांगण्यात आले. वेकोलिने ते कुणाकडून भाडे तत्वावर घेतले, या बद्दल मात्र कुणीही जबाबदार व्यक्ती माहिती देऊ शकली नाही.(लोकमत न्यूज नेटवर्क)