गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:08 IST2021-03-21T04:08:15+5:302021-03-21T04:08:15+5:30

नागपूर : पाचपावली ठाण्यांतर्गत लाल गंज खैरीपुरा येथील ३५ वर्षाच्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. देवेंद्र बापूजी निमजे असे ...

Suicide by strangulation | गळफास घेऊन आत्महत्या

गळफास घेऊन आत्महत्या

नागपूर : पाचपावली ठाण्यांतर्गत लाल गंज खैरीपुरा येथील ३५ वर्षाच्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. देवेंद्र बापूजी निमजे असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी रात्री ७.१५ वाजता देवेंद्र घराच्या छतातील बल्लीला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. पाचपावली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

००

भरधाव ऑटोच्या धडकेमुळे चिमुकल्याचा मृत्यू

नागपूर : पारडीच्या भांडेवाडी परिसरात भरधाव ऑटोच्या धडकेमुळे एका दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. इशान मने असे बालकाचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता इशान आपल्या घरासमोर खेळत होता. दरम्यान, ऑटो क्र. एमएच/४९/एआर/९६२२ चा आरोपी भरधाव वेगाने ऑटो चालवित होता. आरोपी चालक लक्ष्मीकांत सावरकर (३५) याने धडक दिल्यामुळे इशान गंभीर जखमी झाला. त्यास भवानी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

......

Web Title: Suicide by strangulation