शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

फुटाळ्यावर ‘सुसाईड ड्रामा’

By admin | Updated: January 13, 2016 03:23 IST

कर्जदारांच्या तगाद्यामुळे एका व्यावसायिकाने फुटाळा तलाव गाठला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या व्यावसायिकाचे वकील मित्र ठाण्यात पोहोचले.

कर्जमाफीसाठी शक्कल : पोलिसांनी दिली समजनागपूर : कर्जदारांच्या तगाद्यामुळे एका व्यावसायिकाने फुटाळा तलाव गाठला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या व्यावसायिकाचे वकील मित्र ठाण्यात पोहोचले. तेथे कर्जदारांवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप लावून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तब्बल दोन तास ‘सुसाईड ड्रामा’ चालला. नंतर प्रकरण अंगलट येण्याचे संकेत मिळाल्याने व्यावसायिक आणि त्याच्या मित्रांनी पोलीस ठाण्यातून काढता पाय घेतला.घटना सकाळी ११ पासून सुरू झाली. बऱ्याच वेळेपासून एक व्यक्ती फुटाळा तलावाच्या काठावर बसला होता. त्याच्या एकूणच हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याच्यावर अनेकांनी नजर रोखली. त्याने काठावरून उडी मारताच मासेमारी करणाऱ्यांनी लगेच त्याला बाहेर काढले. माहिती कळाल्याने अंबाझरी पोलिसांनी त्याला फुटाळ्यावरून ठाण्यात आणले. तेथे त्याची चौकशी केल्यानंतर कर्जदारांच्या तगाद्यामुळे आपण आत्महत्या करीत होतो, असे त्याने सांगितले. लगेच त्याचे काही वकील मित्र पोहोचले. त्यांनीही आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी चौकशी केली असता, कर्ज चुकविण्यासाठी हा ‘सुसाईड ड्रामा’ घडवून आणल्याचे लक्षात आल्यामुळे पोलिसांनी ‘त्याला’ झापले आणि घराकडे पाठविले. संबंधित व्यक्तीवर लाखोंचे कर्ज असल्याची माहिती असून, कर्जमाफी मिळविण्यासाठीच त्याने हा प्रकार घडवून आणल्याची जोरदार चर्चा आहे.(प्रतिनिधी)