शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसात अहवाल सादर करा : महापौरांचे मनपा आयुक्तांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 20:52 IST

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला दिलेल्या आदेशानुसार १९ दिवसानंतरही प्रशासनाकडून लेखी स्वरूपात उत्तरे मिळालेली नाहीत. ही अत्यंत दुर्दैवी बाब असून सभागृहाचा अवमान असल्याचा आरोप करीत याबाबतचा अहवाल तीन दिवसात सादर करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाठविलेल्या पत्रात दिले आहे.

ठळक मुद्देप्रशासनाने सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला दिलेल्या आदेशानुसार १९ दिवसानंतरही प्रशासनाकडून लेखी स्वरूपात उत्तरे मिळालेली नाहीत. ही अत्यंत दुर्दैवी बाब असून सभागृहाचा अवमान असल्याचा आरोप करीत याबाबतचा अहवाल तीन दिवसात सादर करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाठविलेल्या पत्रात दिले आहे.महापालिकेची सर्वसाधारण सभा २६ जून रोजी घेण्यात आली. या सभेत पीठासीन अध्यक्ष महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाला विविध निर्देश दिले होते. ६ जुलैपर्यंत निर्देशांवरील कारवाईचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचे सांगितले होते. परंतु, १९ दिवसानंतरही अहवाल प्रशासनाकडून देण्यात आलेला नाही. त्यामुळे, महापौरांनी येत्या तीन दिवसात अहवाल मागितला आहे.सभेत महापौरांनी नितीन साठवणे यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याकरिता राज्य शासनाला प्रस्ताव सादर करणे, के.टी.नगर दवाखाना व इतर पाच दवाखान्यांबाबत स्थायी समिती अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशी अहवाल सादर करावा. चेंबर दुरुस्ती व त्यावर झालेल्या खचार्बाबत मुख्य अभियंत्यांची एक सदस्यीय समिती स्थापन करून १५ दिवसात निर्णय द्यावा. प्रमोद हिवसे काही दिवसापूर्वी ड्रायव्हर होता, त्याचे प्रमोशन कसे झाले, यावरील आक्षेपाबाबत चौकशी करावी. जाफरी हॉस्पिटलसंदर्भात डॉ. सवई, एमएचओ यांनी चौकशी करून सात दिवसात अहवाल सादर करणे, एलईडी पथदिव्यांची नस्ती १३५ दिवस लेखा व वित्त विभागाग अधिकाऱ्यांनी स्वत:जवळ ठेवल्याबाबत त्यांच्या मूळ विभागाला डिसिप्लीन कार्यवाही करण्याची शिफारस करणे, डॉ. प्रवीण गंटावार व डॉ. शिलू गंटावार यांचे तात्काळ निलंबन करुन स्थायी समिती अध्यक्ष यांच्या समितीने त्यांची चौकशी करणे. शहरातील कामाच्या संविदाबाबत माहिती स्थायी समितीपासून लपवून ठेवणे, या सर्व बाबी गंभीर स्वरूपाच्या असल्यामुळे याबाबत मनपा आयुक्तांनी ६ जुलैपर्यंत आपले स्पष्टीकरण सादर करावे.नियमानुसार स्थायी समितीच्या अनुमतीने राज्य शासनाकडून आयुक्त, अति आयुक्त यांनी सुट्यांची मंजूरी घेणे अपेक्षित असताना रजेबाबत स्थायी समितीची अनुमती घेतली नाही, याबाबत आयुक्तांनी स्पष्टीकरण सादर करावे, असे निर्देश दिले होते. परंतु, प्रशासनाकडून अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे महापौरांनी आयुक्तांना तीन दिवसात अहवाल मागविला आहे.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीtukaram mundheतुकाराम मुंढे