शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
4
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
6
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
7
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
8
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
9
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
10
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
11
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
12
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
13
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
14
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
15
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
16
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
17
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
18
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
19
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
20
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना २६ जानेवारीपूर्वी मिळणार गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अखेर जिल्हा परिषद शाळेतील खुल्या व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अखेर जिल्हा परिषद शाळेतील खुल्या व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशनाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा विषय रखडलेला होता. यावर्षीच्या अर्थसंकल्पात जि.प. ने विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी पहिल्यांदाच तब्बल ४५ लाखाची तरतूद केली आहे. यापैकी विद्यार्थी संख्येनुसार केवळ ३९ लाख रुपयेच लागणार असल्याचे सांगण्यात येते. परंतु अद्यापपर्यंत हा निधीच शाळा स्तरावर वळता करण्यात आलेला नाही, परंतु याबाबत शिक्षण व वित्त सभापती भारती पाटील यांनी आज गुरुवारी ‌“लवकरच हा निधी शाळा स्तरावर वळाता करुन २६ जानेवारीपूर्वी विद्यार्थ्यांना गणवेशाची पूर्तता करण्यात येईल” अशी ग्वाही दिली.

समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत जि.प. शाळेमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या एससी, एसटी, बीपीएल प्रवर्गातील मुले तसेच सर्व मुलींना मोफत गणवेश दिल्या जातो. परंतु यामध्ये ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश नसतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये न्यूनगंड तयार होते. यंदा या विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी शिक्षण व वित्त सभापती भारती पाटील यांनी ४५ लक्ष रुपयांची तरतूदही केली. अध्यक्ष रश्मी बर्वे, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, सभापती भारती पाटील व सीईओ योगेश कुंभेजकर यांनी या विषयाला गांभीर्याने घेत कोरोनाच्या संकटकाळातही या विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी निधी उपलब्ध करुन देत, ग्रामीण पालकांना दिलासा देण्याच्या प्रयत्न केला आहे. आज या प्रवर्गातील १३ हजार विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येते.