शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खेळताना हटकले म्हणून हल्ला

By admin | Updated: June 3, 2017 01:50 IST

क्रिकेट खेळण्याच्या नावाखाली शिवीगाळ करीत गोंधळ घालणाऱ्या मुलांना हटकले म्हणून मुलांच्या

गोधनी रोडवरील घटना : आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : क्रिकेट खेळण्याच्या नावाखाली शिवीगाळ करीत गोंधळ घालणाऱ्या मुलांना हटकले म्हणून मुलांच्या नातेवाईकांनी हटकणाऱ्याच्या घरावर हल्ला चढवला. घराचे दार तोडून आतमध्ये शिरलेल्या हल्लेखोरांनी एका कुटुंबातील महिला-पुरुषांना बेदम मारहाण केली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ही घटना घडली. गोधनी मार्गावर दर्शना सोसायटी असून, येथे किरण सुदाम भानावत (वय ३०) राहतात. बुधवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास त्यांच्या घरासमोर काही मुले क्रिकेट खेळत होती. क्रिकेट खेळताना ही मुले अश्लील हातवारे करून घाणेरड्या शिव्या देत होती. त्यामुळे किरण यांनी त्या मुलांना हटकले. चांगले खेळा, शिव्या देऊ नका, असा सल्लाही दिला. त्यावरून क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी किरण यांच्यासोबत वाद घातला. बाचाबाची केल्यानंतर पाहून घेण्याची धमकी देऊन मुले निघून गेली. त्यानंतर रात्री ९.४५ वाजता आरोपी नागेश पवार (वय २८), शिवधन पवार (वय २३), ललिताबाई पवार (वय ४७), ज्योती विक्की राठोड (वय २६), विक्की राठोड (वय ३०) आणि त्यांचा एक साथीदार किरण यांच्या घरावर चालून आले. ते हल्ला करणार असल्याचे लक्षात आल्यामुळे किरण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घराचे दार लावून घेतले असता आरोपींनी दारावर लाथा मारून कोंडा तोडला. घरात शिरून हल्लेखोरांनी किरण, किरण यांची आई, पत्नी तसेच वहिनींना अश्लील शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. पुन्हा आमच्या मुलांना हटकले तर जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन आरोपी पळून गेले. परिसरात तणाव या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. आजूबाजूची मंडळी मोठ्या संख्येत जमा झाल्याने प्रकरण भलत्याच वळणावर जाण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, काही लोकांनी समंजसपणा दाखवल्यामुळे पुढची घटना टळली. दरम्यान, किरण यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. आरोपींना अटक झाली की नाही, ते वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नव्हते.