शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात २८ जागांवर स्ट्रेट फाईट

By admin | Updated: February 16, 2017 22:35 IST

महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच उमेदवार स्थानिक व परिचित असतात. रिंगणातील उमेदवारांची संख्या जास्त झाली की मतदारही

 ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 16 -  महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच उमेदवार स्थानिक व परिचित असतात. रिंगणातील उमेदवारांची संख्या जास्त झाली की मतदारही गोंधळतो. नेमके कुणाला मत द्यावे यावरून तो मतदानापर्यंत गोंधळतो. मात्र, तब्बल २८ जागांवर मतदारांचे टेन्शन कमी झाले आहे. या जागांवर फक्त दोन ते चारच उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे योग्य उमेदवार निवडायला मतदारांनाही सोपे जाणार असले तरी उमेदवारांचा मात्र कस लागणार आहे. निवडणूक रिंगणात एका जागेवर दोन उमेदवारांमध्ये स्ट्रेट फाईट होत आहे. ७ जागांवर प्रत्येकी तिरंगी तर २० जागांवर प्रत्येकी चौरंगी लढत आहे. १५ जागांवर प्रत्येकी पाच उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक ३६ (ब) या एकमेव जागेवर दोनच उमेदवार रिंगणात आहेत. येथे काँग्रेसच्या नगरसेविका रेखा बाराहाते तर भाजपाच्या नगरेसविका पल्लवी शामकुळे यांच्यात थेट लढत होत आहे. दोन नगररसेविकांमध्ये होत असलेल्या या थेट लढतीची शहरात चर्चा आहे. दोन्ही नगरसेविका अनुभवी आहेत. त्यामुळे आता मतदार कुणाला पसंती देतात हे निकालानंतरच स्पष्ट होईल.प्रभाग ३७ (ब) व (क) मध्ये तिरंगी लढत आहे. ३७ ब मध्ये भाजपाच्या सोनाली कडू, काँग्रेसच्या राधिका नासरे व बसपाच्या धारणी पटले यांच्यात लढत होत आहे. तर ३७ क मध्ये भाजपाच्या नंदा जिचकार, काँग्रेसच्या प्रज्ञा पन्नासे, बसपाच्या ममता बोदेले यांच्यात सामना रंगणार आहे. ३५ ब मध्ये नंदा देशमुख (काँग्रेस), मनिषा पडोळे (बसपा) व जयश्री वाडीभस्मे (भाजपा), प्रभाग २७ (ब) मध्ये सीमा ढोक (काँग्रेस), कुसुमताई बावनकर (शिवसेना) व दिव्या धुरडे (भाजपा), प्रभाग १९ (क) मध्ये रेखाबाई गौर (राष्ट्रवादी काँग्रेस), सरला नायक (भाजपा) व ररश्मी इरफान काजी (काँग्रेस), प्रभाग १६ (क) मध्ये संजना देशमुख (शिवसेना), गीता यादव (काँग्रेस) व लक्ष्मी यादव भाजपा यांच्यात तिरंंगी लढत होत आहे. फक्त एकाच जागेवर पुरुष उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होत आहे. प्रभाग ३२ (अ) मध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवर भाजपाचे अभय गोटेकर, काँग्रेसचे सुरेश तेलंग व राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास ठाकरे यांच्यात टक्कर आहे. महिला राखीव जागांवरच तिरंगी- एकूण सात जागांवर प्रत्येकी तीनच उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी तब्बल सहा महिलांसाठी राखीव आहेत. याचाच अर्थ सहा जागांवर तीन पेक्षा जास्त महिलांनी निवडणूक लढविण्यात रस घेतला नाही. राजकारणात महिला सक्षमीकरणावर भर दिला जात असताना तब्बल सहा जागांवर तीन पेक्षा जास्त महिला रिंगणातच राहू नये ही बाब चिंताजनक आहे. २० जागांवर चौरंगी सामना  एकूण २० जागा अशा आहेत ती तेथे फक्त चारच उमेदवार रिंगणात आहेत. यातही १४ जागा महिललांसाठी राखीव असलेल्या आहेत. येथेही चार पेक्षा जास्त महिला उमेदवार रिंगणात उतरलेल्या नाहीत. २० जागांपैकी काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा व शिवसेनेला उमेदवारच मिळालेले नाहीत. सहयोगी उमेदवारांना फायदा  ज्या जागेवर चार पेक्षा कमी उमेदवार आहेत तेथे संबंधित उमेदवाराच्या सहयोगी उमेदवाराला त्यांच्या प्रचाराचा फायदा होत आहे. रिंगणात कमी उमेदवार असल्यामुळे स्पर्धा कमी आहे. त्यामुळे उमेदवाराला मिळालेले मत सहयोगी उमेदवारालाही मिळण्याची शक्यता वाढली आहे.