शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

नागपुरात वादळाचा फटका : विजेचे खांब वाकले, झाडे पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 12:11 AM

गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने चांगलाच फटका बसला. शहर व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले. डझनभर वृक्ष कोसळून पडले. तासभर हैदोस घातल्यानंतर वादळ शांत झाले. परंतु तोपर्यंत जनजीवन विस्कळीत झाले होते. ढगांमुळे मागील दोन दिवसांच्या तुलनेत पारा ४३.२ डिग्री सेल्सिअसवर आला आहे. २४ तासात कमाल तापमान ३.१ डिग्री सेल्सिअसने खाली आले.

ठळक मुद्देजनजीवन विस्कळीत, बुटीबोरीत फीडरचे १५ वीज खांब कोसळलेजामठ्यातील दोन वीज मनोरे जमीनदोस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने चांगलाच फटका बसला. शहर व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले. डझनभर वृक्ष कोसळून पडले. तासभर हैदोस घातल्यानंतर वादळ शांत झाले. परंतु तोपर्यंत जनजीवन विस्कळीत झाले होते. ढगांमुळे मागील दोन दिवसांच्या तुलनेत पारा ४३.२ डिग्री सेल्सिअसवर आला आहे. २४ तासात कमाल तापमान ३.१ डिग्री सेल्सिअसने खाली आले.वातावरण अचानक बदलल्याने शहरात वीज वितरण यंत्रणा पूर्णत: प्रभावित झाली. मानकापूर येथून निघणाऱ्या ३३ केव्ही लाईनशी जुळलेले सर्व परिसर अंधारात बुडाले. विनोबा भावेनगर येथे विजेचे खांब वाकले. बिनाकी फीडरवर वृक्ष कोसळल्याने एचटी लाईनचा खांबही पूर्णत: खाली वाकला. दुसरीकडे ग्रामीण भागात महावितरणला मोठा फटका बसला. बुटीबोरी, हिंगणा, मौदा या ग्रामीण भागात वादळी पावसाने थैमान घातल्याने वीज खांब अक्षरश: कोलमडून पडले. अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर वृक्ष कोलमडून पडल्याने ग्रामीण भागाला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या ठप्प झाल्या. परिणामी नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात वीज पुरवठा विस्कळीत झाला होता.बुटीबोरी औद्योगिक वसाहतीला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिनीला अनेक ठिकाणी फटका बसला. बुटीबोरी एमआयडीसी येथील महावितरणच्या उपकेंद्रातून निघणाऱ्या मोरारजी वाहिनीवरील १५ विजेचे खांब संध्याकाळी ५.३० च्या सुमारास आलेल्या वादळामुळे कोलमडून पडले. सोबतच हिंगणा-जामठा या वीज वाहिनीचे दोन मनोरे जमीनदोस्त झाल्याने या भागातील वीज पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला होता.मौदा शहरालादेखील वादळी पावसाचा फटका बसला. वादळी पावसामुळे मौदा शहरातील सुमारे पाच हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला. कळमेश्वर येथील वीज पुरवठा काहीअंशी सुरळीत करण्यात महावितरणला यश आले होते. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे मुख्य अभियंता घुगल यांनी सांगितले. दीक्षाभूमी येथे चित्रकला महाविद्यालयासमोर एक वृक्ष वादळी पावसामुळे कोसळून रस्त्याच्या मध्ये आले. त्यामुळे वाहतूक विस्कळत झाली होती. बराच वेळ वाहतूक विस्कळीत राहिली.

 

टॅग्स :Natural Calamityनैसर्गिक आपत्तीnagpurनागपूर