शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पंप चालकांचे खरेदी बंद आंदोलन

By admin | Updated: April 10, 2015 02:17 IST

सीआयपीडी या राष्ट्रीय पातळीवरील पेट्रोलियम डीलर्स संघटनेच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील फामपेडशी संलग्न विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनतर्फे...

नागपूर : सीआयपीडी या राष्ट्रीय पातळीवरील पेट्रोलियम डीलर्स संघटनेच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील फामपेडशी संलग्न विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी ११ एप्रिलला पेट्रोल खरेदी बंद आंदोलन करण्यात येणार आहे. यादिवशी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळात एका शिफ्टमध्ये पंप सुरू राहणार असल्याची माहिती असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. एलबीटी, व्हॅट, एसएससी या विषयावर राज्य सरकारने ताबडतोब निर्णय घ्यावेत. मागण्या न सुटल्यास बेमुदत खरेदी बंद आंदोलन करण्याचा इशारा असोसिएशनने यावेळी दिला. डीलर्स मार्जिन वाढवावी, अपूर्वचंद्र समितीच्या शिफारशीनुसार वर्षातून दोनदा खर्चावर आधारित सुधारणा व्हावी, पंपावरील सेवा सुविधा सशुल्क असावी, मार्जिन ठरविताना १९९७ चा (नेट फिक्स अ‍ॅसेट) आधार घ्यावा, नवीन ३३,००० डीलर्सच्या नेमणुका त्वरित थांबवाव्यात, याशिवाय जे डीलर्स व्यवसायात राहू इच्छित नाहीत, त्यांना डीलरशिपमधून बाहेर पडण्याचा व त्यांना त्यांच्या जमिनी परत ताब्यात देण्यात याव्यात, अशी मागणी असोसिएशनने केली. स्पर्धात्मक युगामध्ये खासगी स्पर्धकांना कोणतीही एमडीजी लागू नाही. निकोप स्पर्धेसाठी व गैरवापर टाळण्यासाठी एमडीजी रद्द करण्यात यावा आणि एमडीजीखाली असलेल्या दंडात्मक कारवाईची तरतूद रद्द करावी, छोट्या टँकरमधून डिझेल विक्री बंद व्हावी, जुन्या डीपची कालबाह्य पद्धत बंद रद्द करून पंपावर येणारा स्टॉक फ्लो मीटरने ताब्यात मिळावा, डीलर्सचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी नमूद केलेल्या तारखांनाच पेट्रोल व डिझेलचे दर कमी-जास्त व्हावेत, कुटुंबातील सदस्यांमध्ये डीलर्सशिपच्या मालकीविषयी बदल करायचा असल्यास ती पद्धत सोपी करून त्यावर फी आकारू नये, रिसाईटेड साईट्सला दुसरे प्रॉडक्ट देऊन कायम डीलर करावे, डायव्हर्शन, नो एन्ट्री, रस्ता रुंदीकरण, पूल या कारणांनी आपद्ग्रस्त झालेल्या डीलर्सचे पुनर्वसन करावे, आदी मागण्यांवर सरकार आणि कंपन्यांनी गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी असोसिएशनने केली. (प्रतिनिधी)