शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अरुंधती रॉय यांचा पुतळा जाळला

By admin | Updated: December 30, 2015 03:26 IST

नक्षलवादाला वैचारिक विरोध असण्याचा दावा करणाऱ्या नागपुरातील भूमकाल संघटनेने मंगळवारी बुकर पुरस्कार विजेती लेखिका अरुंधती रॉय यांचा पुतळा दहन केला.

भूमकाल संघटनेची निदर्शनेनागपूर : नक्षलवादाला वैचारिक विरोध असण्याचा दावा करणाऱ्या नागपुरातील भूमकाल संघटनेने मंगळवारी बुकर पुरस्कार विजेती लेखिका अरुंधती रॉय यांचा पुतळा दहन केला. नक्षलवाद्यांचे समर्थन करणाऱ्या अरुंधती रॉय देशद्रोही असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. विशेष म्हणजे नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने रॉय यांच्या भूमिकेवर आक्षेप घेत त्यांना अवमानना नोटीस बजावली होती.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांना मदत करीत असल्याचा आरोप असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्रा. जी.एन. साईबाबा यांचा जामीन नाकारून त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले होते. गडचिरोली पोलिसांनी साईबाबाला मागील वर्षी अटक केली होती. त्यानंतर जून महिन्यात त्यांची जामिनावर सुटका झाली असून ही मुदत ३१ डिसेंबरला संपणार आहे. अरुंधती रॉय यांनी एका प्रतिष्ठित मॅगझीनमध्ये साईबाबांचा जामीन आणि न्यायालयाच्या भूमिकेबाबत आक्षेपार्ह लेख लिहिल्याचे सांगण्यात येत आहे. नागपूर खंडपीठाकडून रॉय यांच्या या लेखाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. न्या.ए.बी. चौधरी यांनी रॉय यांची भाषा अशोभनीय असल्याचे ताशेरे ओढले. रॉय स्वत:ला न्यायालयापेक्षा मोठ्या समजतात का, असा सवाल करीत न्यायालयाने त्यांना अवमानना नोटीस बजावली; सोबतच न्यायालयाने साईबाबाला अटक करण्याचे आदेशही दिले होते. दत्ता शिर्के यांच्या नेतृत्वात मंगळवारी भूमकाल संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंचशील चौकात अरुंधती रॉय यांचा पुतळा दहन करून त्यांचा निषेध केला. नक्षलवादी, काश्मिरी फुटीरवादी यांचे समर्थन करणाऱ्या अरुंधती रॉय आपल्या पेज-३ प्रतिमेचा उपयोग करून देशाची प्रतिमा मलीन करीत असल्याचा आरोप दत्ता शिर्के यांनी यावेळी केला. त्यांचे वर्तन लोकशाही आणि देशविरोधी असून न्यायालयाचा अपमान करणारे आहे, असा आरोपही शिर्के यांनी यावेळी केला. दरम्यान, या घटनेमुळे चौकात काही काळ तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी दत्ता शिर्के यांना अटक करून नंतर सुटका केली. (प्रतिनिधी)