शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधाराला अटक, पेपर कसा फुटला?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
3
रुपया ९६ पार, इतिहासात पहिल्यांदा डॉलरच्या तुलनेत इतकी कमकुवत झाली भारतीय करन्सी; सामान्यांवर काय परिणाम होणार?
4
अमित शाह यांना धमकी देणं भोवलं, अभिषेक बॅनर्जी यांच्यावर बंगालमध्ये गुन्हा दाखल; कारवाई होणार
5
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
6
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
7
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
8
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
9
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
10
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
11
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
12
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
13
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
14
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
15
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
16
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
17
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
18
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
19
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
20
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
Daily Top 2Weekly Top 5

मुंडे यांच्या निधनाने राज्याची हानी

By admin | Updated: June 16, 2014 01:08 IST

केंद्र्रीय ग्रामविकास मंत्री व भाजप नेते गोपीनाथ मुंडे हे शेतकऱ्यांचे नेते होते. त्यांच्या निधनामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांला दु:ख झाले असून राज्याची भरून न निघणारी हानी झाल्याचे प्रतिपादन

अस्थिकलश नागपुरात : गडकरींची श्रद्धांजली
नागपूर : केंद्र्रीय ग्रामविकास मंत्री व भाजप नेते गोपीनाथ मुंडे हे शेतकऱ्यांचे नेते होते. त्यांच्या निधनामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांला दु:ख झाले असून राज्याची भरून न निघणारी हानी झाल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले.
मुंडे यांचे दोन अस्थिकलश सकाळी विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईहून नागपुरात आणले. ते गणेशपेठ येथील पक्षाच्या निवडणूक प्रचार कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आले. अस्थिकलशाचे दर्शन घेऊन मुंडे यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली वाहिल्यानंतर गडकरी बोलत होते.
पंचायत समितीचे सभापती अजय बोढारे व पक्षाचे शहर उपाध्यक्ष सुभाष कोटेचा यांनी मुंबईहून दोन अस्थिकलश नागपुरात आणले. अस्थिकलश घेण्यासाठी अजनी रेल्वे स्टेशनवर खासदार अजय संचेती, माजी खा. बनवारीलाल पुरोहीत, प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास, शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे, ग्रामीण अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, आ. सुधाकर देशमुख, विजय घोडमारे, विकास कुंभारे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, संजय भेंडे,श्रीपाद रिसालदार, सुधीर हिरडे, मनोज पांडे, प्रभाकर येवले, सुधाकर कोहळे, प्रमोद पेंडके, श्रीकांत देशपांडे, डॉ. रवींद्र भोयर, माजी महापौर कल्पना पांडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी, संदीप जोशी, अविनाश ठाकरे जि.प.चे माजी अध्यक्ष रमेश मानकर, माजी आ. अशोक मानकर, अविनाश ठाकरे, राजेश बागडी, चेतना टाक व चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते. अस्थिकलश सजवलेल्या जीपमधून सन्मानाने गणेशपेठ येथील कार्यालयात आणले.
अस्थिकलशाच्या दर्शनासाठी पक्ष कार्यक र्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी गडकरी यांच्यासह महापौर अनिल सोले, सत्तापक्षनेते प्रवीण दटके, भाजपच्या प्रदेश महिला अध्यक्ष सीमा वाघ, जि.प.अध्यक्ष संध्या गोतमारे, उपमहापौर जैतुन्नबी पटेल,जि.प.सदस्य पे्रम झाडे, बंडू राऊ त, बंटी कुकडे, संदीप गवई, संदीप जाधव, डॉ. सुरेश चांडक, रिना कुत्तरमारे संजय फांजे, मनिषा कोठे यांच्यासह शहर व ग्रामीणमधील कार्यकर्त्यांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले.
सोमवारी सायंकाळी ५ वाजता अस्थिकलशांचे कन्हान नदीत विसर्जन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)