शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

ट्रामा केअर सेंटर सुरू करा

By admin | Updated: March 15, 2016 05:07 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) ट्रामा केअर सेंटर रखडले आहे. अपघातग्रस्त रुग्णांना वेळेवर

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) ट्रामा केअर सेंटर रखडले आहे. अपघातग्रस्त रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. परिणामी, रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. रुग्णहितार्थ ‘ट्रामा केअर’ ताबडतोब सुरू करा, या मागणीला घेऊन सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना घेराव घालून समस्यांचे निवेदन दिले. मेडिकलमध्ये दररोज हजारो गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. पूर्वी गरिबांना मोफत औषधे देण्यात येत होते. मात्र, आता रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यासाठी चिठ्ठी लिहून दिली जात आहे. दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना औषधे मोफत देण्याचा नियम आहे. परंतु त्यांनाही महागडे औषधे बाहेरून विकत घ्यावी लागत आहे. एक्स-रे, सोनोग्राफी मशीन वारंवार खराब होत असल्यामुळे रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पॅथालॉजीची सेवा २४ तास उपलब्ध नसल्याने रात्रीच्या रुग्णांना बाहेरून तपासणी करून आणावी लागत आहे. यंत्रे कमी असल्यामुळे रुग्णांवर १५ ते २० दिवस उपचारच होत नाही. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना मेडिकलमधील डॉक्टर स्वत:च्या खासगी दवाखान्यात जाण्याचा सल्ला देतात. कर्मचारी रुग्ण तथा नातेवाईकांशी सौजन्याने वागत नाहीत. दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना एमआरआय सेवा मोफत देणे, सीटी स्कॅन व इतर यंत्रे वाढविण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. यावर प्रस्ताव पाठविणार असल्याचे डॉ. निसवाडे यांनी सांगितले. मेडिकलच्या समस्या ताबडतोब मार्गी न लागल्यास राष्ट्रवादीतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला. शिष्टमंडळात नगरसेवक दुनेश्वर पेठे, प्रवीण कुंटे, कादीर शेख, रवींद्र इटकेलवार, चरणजितसिंह चौधरी, महेंद्र भांगे, मोहन आगासे, साहिल सय्यद, प्रकाश मेश्राम आदींसह अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग होता.(प्रतिनिधी)