शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘चलनकोंडी’त अडकल्या पतसंस्था

By admin | Updated: November 16, 2016 02:31 IST

पतसंस्थांना अजूनही जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेली नाही.

नागपूर : पतसंस्थांना अजूनही जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेली नाही. पण त्यांनाही नोटा बदलवून देण्यास परवानगी दिल्यास इतर बँकांमध्ये होणारी गर्दी कमी होऊन जास्तीत जास्त लोकांना नवे चलन मिळेल. सध्या परवानगी न दिल्यामुळे पतसंस्थांची ‘चलनकोंडी’ होत असून, त्यांचे आर्थिक व्यवहार आणि कर्जवसुली ठप्प आहे. चलन व्यवहाराची परवानगी द्यावीजिल्ह्यात १००७ पतसंस्था आहेत. या सर्व संस्थांचे व्यवहार बंद आहेत. नोटा बदलवून देण्याचे वा नवीन देण्याचे अधिकार पतसंस्थांना नाहीत. सर्वच पतसंस्थांमध्ये ग्राहक मोठ्या संख्येने येत आहेत. त्यांचे समाधान करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. पतसंस्थांना अधिकार देण्याची मागणी राज्य पतसंस्था फेडरेशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीवर योग्य निर्णय व्हावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी अर्थतज्ज्ञांचा सल्ला मागितला आहे. चलन बदलवून देण्याचे अधिकार मिळावेत, दररोज ५ लाख रुपये रोख मिळावी आणि थकीत कर्जदारांकडून वसुलीचे अधिकार मिळावेत, अशी मागणी फेडरेशनने मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र घाटे यांनी लोकमतशी बोलताना दिली. पतसंस्थांना परवानगी मिळावीपतसंस्थांना जुन्या नोटा स्वीकारण्याची आणि बदलवून देण्याची मागणी रिझर्व्ह बँकेकडे केली असून पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. पतसंस्थांना परवानगी दिल्यास बँकांसमोरील रांगा कमी होण्यास मदत होईल. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. चंद्रकांत दळवी, सहकार आयुक्त.कर्जवसुली थांबलीपतसंस्थांना जुन्या नोटांच्या आर्थिक व्यवहाराची परवानगी मिळावी म्हणून मंगळवारी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांची भेट घेतली. या भेटीत यावर तोडगा निघाला नाही. अर्थतज्ज्ञांचे मत मांडल्यानंतरच त्यावर निर्णय घेऊ, असे दळवी यांनी सांगितल्याचे घाटे म्हणाले. रिझर्व्ह बँकेच्या दुर्लक्षतेमुळे पतसंस्थांचे अस्तित्त्व संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे. संस्थेच्या प्रतिनिधींकडून जुन्या नोटा स्वीकारण्यास पतसंस्थेने मनाई केली आहे. त्यामुळे व्यावसायिक आणि लोकांकडून दैनंदिन रक्कम गोळा करणाऱ्या प्रतिनिधींची वसुली थांबली आहे. योग्य तो निर्णय घेऊन पतसंस्थांना नोटा स्वीकारण्याची आणि बदलवून देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी घाटे यांनी केली.