एसटी महामंडळाचे एनसीएमसी कार्ड; एजंटकडून लाखोंचा घोटाळा

By नरेश डोंगरे | Updated: May 11, 2026 19:12 IST2026-05-11T19:11:39+5:302026-05-11T19:12:16+5:30

Nagpur : प्रवासभाड्यात सवलत मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांना बंधनकारक केलेल्या एनसीएमसी कार्ड प्रकल्पात एजंटकडून मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती आहे.

ST Corporation's NCMC card; Agent scams lakhs | एसटी महामंडळाचे एनसीएमसी कार्ड; एजंटकडून लाखोंचा घोटाळा

ST Corporation's NCMC card; Agent scams lakhs

नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
प्रवासभाड्यात सवलत मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांना बंधनकारक केलेल्या एनसीएमसी कार्ड प्रकल्पात एजंटकडून मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती आहे. नागपुरात एजंटने प्रति कार्ड २१ रुपये जास्त उकळल्याचे स्पष्ट होताच संबंधित वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.

स्वातंत्र्य संग्राम सैनिकांपासून तो दिव्यांग नागरिकांपर्यंत समाजातील वेगवेगळ्या घटकांना एसटी महामंडळाकडून प्रवास भाड्यात वेगवेगळी सूट दिली जाते. ही सूट मिळवण्यासाठी त्या त्या घटकाला त्यांच्याशी संबंधित ओळखपत्र दाखवावे लागते. मात्र, गेल्या चार वर्षांपुर्वी एसटी महामंडळाने 'स्मार्ट' कार्डची योजना सुरू केली आहे. हे कार्ड दाखविले तरच प्रवास भाड्यात सवलत मिळेल, अशीही अट महामंडळाने घातली होती. ही योजना बारगळ्यानंतर आता नव्याने एनसीएमसी कार्ड दाखवा आणि प्रवास भाड्यात सवलत मिळवा, असा सूर आळवत महामंडळाने एसटीच्या प्रवाशांना सवलतीसाठी हे कार्ड बंधनकारक केले होते. हे एनसीएमसी कार्ड तयार करून देण्याचे कंत्राटही महामंडळाने खासगी व्यक्तींना दिले. त्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून कार्ड बनविण्यासाठी एसटीच्या विविध बस स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी बघायला मिळत आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एसटीच्या नागपूर विभागात आतापावेतो सुमारे एक लाख कार्ड तयार करण्यात आले आहे. एका कार्डसाठी महामंडळाने एजंटला १९९ रुपये घेण्याचे आदेश दिले आहे. मात्र, नागपूर स्थानकावर हे कार्ड तयार करून देणारा एजंट प्रत्येक कार्डचे २२० रुपये घेत होता. अर्थात प्रत्येक कार्डमागे तो २१ रुपये जास्त घेत होता. अशा प्रकारे त्याने कार्डच्या बनवाबनवीत लाखोंचा घोटाळा केल्याचा संशय आहे.

असे फुटले बिंग

नागपूर आगारातील कार्ड वितरण केंद्रावर ६ मे रोजी संबंधित एजंट २१ रुपये प्रत्येक कार्डधारकाकडून जास्त घेत असल्याने गर्दीतील काहींनी त्याला विचारणा केली. यावेळी त्याने उन्हातान्हात तुमचे काम करून देतो, २१ रुपये जास्त घेतले तर काय बिघडते, असा उर्मट प्रश्न केला. प्रवाशांनी त्याला विरोध केला असता ' कार्ड तयार करून मिळणार नाही' असे म्हणून वितरण केंद्राची खिडकी एजंटने बंद केली. परिणामी संतप्त प्रवाशांनी त्याची अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तक्रारीनंतर बसस्थानक प्रमुखाने संबंधित एजंटला विचारणा केली असता त्याने अधिकाऱ्यांसोबतही बाचाबाची केल्याची माहिती आहे.

गैेरप्रकाराची माहिती, चाैकशी सुरू

बोघाटा झाल्याने हा कार्ड घोटाळा सध्या एसटी महामंडळात सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. हा घोटाळा नागपूरातच झाला की राज्यातील अनेक ठिकाणी, याबाबतही उलटसुलट चर्चा केली जात आहे. दरम्यान, या संबंधाने एसटीचे विभागीय व्यवस्थापक श्रीकांत गभणे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी या गैेरप्रकाराची माहिती असून, त्याची चाैकशी केली जात असल्याचे 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
 

Web Title : एसटी निगम का एनसीएमसी कार्ड घोटाला: एजेंट ने लाखों का गबन किया

Web Summary : नागपुर में एक एजेंट ने एसटी निगम के एनसीएमसी कार्ड के लिए अधिक शुल्क लिया, जो यात्रा छूट के लिए थे, संभावित रूप से लाखों का गबन किया। अधिक शुल्क और दुर्व्यवहार के बाद शिकायतें आईं, जिससे घोटाले की जांच शुरू हुई।

Web Title : ST Corporation's NCMC Card Scam: Agent Embezzles Lakhs

Web Summary : An agent in Nagpur overcharged for ST Corporation's NCMC cards, intended for travel discounts, potentially embezzling lakhs. Complaints arose after overcharging and misconduct, prompting an investigation into the scam's extent.

टॅग्स :nagpurनागपूर