शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत ले-आऊटच्या चौकशीसाठी पथक

By admin | Updated: February 19, 2015 01:55 IST

मेट्रो रिजनच्या (नागपूर महानगर क्षेत्र विकास योजना) नावावार जाहिरातबाजी करून नासुप्रने मंजूर न केलेल्या ले-आऊटमधील प्लॉट विकण्याचा गोरखधंदा जोरात सुरू आहे.

नागपूर : मेट्रो रिजनच्या (नागपूर महानगर क्षेत्र विकास योजना) नावावार जाहिरातबाजी करून नासुप्रने मंजूर न केलेल्या ले-आऊटमधील प्लॉट विकण्याचा गोरखधंदा जोरात सुरू आहे. यामुळे अनेकांची फसगत होण्याची शक्यता आहे. लोकमतने या विषयाला वाचा फोडल्यानंतर नासुप्रने याची गंभीर दखल घेतली. अशाप्रकारे अनधिकृत ले-आऊटमधील प्लॉट विक्रीची चौकशी करण्यासाठी नासुप्रतर्फे अधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात येणार आहे. मेट्रो रिजनअंतर्गत येणाऱ्या भागात विविध बाबींसाठी जमीन आरक्षित ठेवण्यात आलेली आहे. कोणत्याही जमिनीवर रहिवासी उपयोगासाठी प्लॉट टाकून विकता येत नाही. मेट्रो रिजनमधील काही जमीन विविध उद्देशांसाठी आरक्षित करण्यात आलेली आहे. काही जमीन एनडीझेड(नो डेव्हलपमेंट झोन)मध्ये आहे. काही ग्रीन बेल्टमध्ये(हरितपट्टा)आहे. दगडखाणीच्या शेजारी रहिवासी बांधकामाची परवानगी देता येत नाही. नासुप्र ले-आऊटचा नकाशा मंजूर करताना या सर्व बाबींची पडताळणी करते. त्यामुळे नकाशा मंजूर नसलेल्या ले-आऊटमधील भूखंड खरेदी करेल व संबंधित जमिनी वरीलपैकी कोणत्याही एका कारणाने बाधित होत असेल तर भविष्यात त्यावर रहिवासी वापराची परवानगी मिळणार नाही. त्यामुळे नागरिकांनी नासुप्रतर्फे मंजूर केलेला ले-आऊट नकाशा पाहूनच प्लॉट खरेदी करावा, असे आवाहन नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. वर्धने म्हणाले, ले-आऊट नकाशा मंजुरीसाठी सादर केल्यानंतर नासुप्रतर्फे फक्त ‘रिसिव्हड’ दिली जाते. ‘सबमिटेड’ असा कुठलाही स्टॅम्प मारला जात नाही. असा स्टॅम्प दाखवून कुणी नगरिकांची फसवणूक करीत असेल तर याची गंभीर दखल घेऊन कारवाई केली जाईल, असा इशाराही वर्धने यांनी दिला. नासुप्रतर्फे अशा प्रकरणाच्या चौकशीसाठी एका अधिकाऱ्याचे पथक नेमले जाईल. संबंधित पथक मेट्रो रिजनमध्ये भूखंड विक्रीच्या जाहिरातींची दखल घेईल व त्यांच्या कार्यालयात जाऊन प्रमाणित कागदपत्रांची तपासणी करेल. याशिवाय नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचीही चौकशी केली जाईल. असे असले तरी नागरिकांनीही सतर्क राहून मंजुरीची मूळ कागदपत्रे पाहूनच भूखंड खरेदी करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)