शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

धम्मचक्र प्रवर्तन दिन - प्रशासन लागले कामाला

By admin | Updated: September 11, 2014 01:08 IST

येत्या ३ आॅक्टोबर रोजी दीक्षाभूमी व कामठी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिन समारंभात येणाऱ्या लाखो बौद्ध बांधवांच्या सोयीच्या दृष्टिकोनाने जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या

विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठकनागपूर : येत्या ३ आॅक्टोबर रोजी दीक्षाभूमी व कामठी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिन समारंभात येणाऱ्या लाखो बौद्ध बांधवांच्या सोयीच्या दृष्टिकोनाने जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा व व्यवस्थेच्या पूर्वतयारीबाबत बुधवारी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपविभागीय अधिकारी राहुल रेखावार, माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्यासह शासनातील विविध विभागीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी बैठकीत दीक्षाभूमी येथे येणाऱ्या लाखो अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी निर्माण करण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यात दीक्षाभूमी परिसरात महापालिकेच्यावतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, स्वच्छतेकडे लक्ष घालून, भाविकांसाठी अस्थायी स्वरूपाचे शौचालये व स्नानगृह निर्माण करणे, वीज कंपनीमार्फत प्रकाश व्यवस्था, मनपा व परिवहन विभागातर्फे बसेसची व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची चोख व्यवस्था ठेवणे आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, अग्निशमन विभागाने सुरक्षा व्यवस्था तयार ठेवणे, आकस्मिक पाऊस आल्यास अनुयायांना थांबण्यासाठी शाळा व महाविद्यालयात व्यवस्था करणे आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.या व्यवस्था सांभाळण्यासाठी तसेच शासनाच्या विविध विभागाकडून करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीचा तपशील तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा, अशी सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. यावेळी सदानंद फुलझेले आणि अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी आयोजनाबाबत विविध सूचना केल्या. सदर सूचनांवर विचार करून तशी व्यवस्था निर्माण करण्यात येईल, असे वानखेडे यांनी यावेळी सांगितले. तसेच कामठी येथील ड्रॅगन पॅलेस येथे येणाऱ्या बौद्ध बांधवांच्या सोयी सुविधांबाबत पूर्वतयारी करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. या बैठकीत विविध विभागांचे अधिकारी आणि दीक्षाभूमी स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)