शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘दक्षिण’ लढविणारच

By admin | Updated: August 14, 2014 01:25 IST

शहरातील दक्षिण नागपूर मतदारसंघावर कोणीही दावा केला आणि याबाबत काहीही अफवा पसरविल्या तरी हा मतदारसंघ शिवसेनेच्या हक्काचा असून येथे पक्षाचाच उमेदवार निवडणूक लढविणार,

उमेदवार आयात करणार नाही : संपर्कप्रमुख दीपक सावंत नागपूर: शहरातील दक्षिण नागपूर मतदारसंघावर कोणीही दावा केला आणि याबाबत काहीही अफवा पसरविल्या तरी हा मतदारसंघ शिवसेनेच्या हक्काचा असून येथे पक्षाचाच उमेदवार निवडणूक लढविणार, तो इतर पक्षातून आयात केलेला नसेल, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख डॉ. दीपक सावंत यांनी केले.वर्धेला भेट देण्यासाठी सावंत बुधवारी सकाळी मुंबईहून विमानाने नागपुरात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी स्थानिक हॉटेलमध्ये निवडक पत्रकारांशी संवाद साधला. दक्षिण नागपूरवर भारतीय जनता पक्षाने यापूर्वीच दावा केला आहे. त्यानंतर महायुतीतील दुसरा घटक पक्ष शिवसंग्रामचाही या मतदारसंघावर डोळा आहे. याकडे सावंत यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, कोणीही दावा केला तरी ‘दक्षिण’ शिवसेनाच लढविणार. याबाबत पक्षप्रमुखांसह इतरही नेत्यांनी यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात बदल होणार नाही. महायुतीतील इतर घटक पक्ष वेगवेगळ्या मतदारसंघावर दावा करू शकतात. पण आम्ही आमचे मतदारसंघ सोडणार नाही, उलट नागपूरमध्ये आणखी एका मतदारसंघात पक्षाने निवडणूक लढवावी, अशी शिवसैनिकांची मागणी आहे व ती पक्षप्रमुखांकडे मांडणार आहे.सावंत यांनी स. ११ वा. रेशीमबागेतील सेना भवनात पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीतही दक्षिण नागपूरची जागा जिंकण्यासाठी शिवसैनिकांनी संपूर्ण शक्ती पणाला लावण्याचे आवाहन त्यांनी केले. निवडणुकीबाबत पदाधिकाऱ्यांची मतेही जाणून घेतली. तत्पूर्वी दिवंगत आरती बोरकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.(प्रतिनिधी)पक्षनिष्ठा, निवडून येण्याची क्षमता पाहूनच उमेदवारीउमेदवाराची पक्षनिष्ठा आणि निवडून येण्याची क्षमता या निकषावर उमेदवार निश्चित केले जातील. अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे सावंत यांनी स्पष्ट केले. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बंदद्वार चर्चा केली. या वेळीही त्यांनी उमेदवारीचे निकष काय असतील याची माहिती दिली. एकदा उमेदवार ठरल्यावर इतरांनी त्याला विजयी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी सूचनाही केली. या वेळी जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे उपस्थित होते. इकडे दक्षिणच्या उमेदवारीसाठी शेखर सावरबांधे, किरण पांडव , किशोर कन्हेरे आणि किशोर कुमेरिया यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. निवडणुकीनंतर संघटनात्मक बदलविधानसभेची निवडणूक झाल्यावर नागपूर जिल्हा शिवसेनेत संघटनात्मक बदल केले जातील. सध्या याबाबत काहीही विचार नाही, असे सावंत यांनी सांगितले. निवडणुकीपूर्वी संघटनेत फेरबदल होणार असल्याची चर्चा सेनेत होती हे येथे उल्लेखनीय.