शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

समाजनिर्मितीचा सेवायज्ञ

By admin | Updated: February 23, 2015 02:21 IST

समाजात अनेक संस्था आणि लोक समाजासाठी स्वत:ला झोकून देतात. अनेक लोक प्रसिद्धीचाही हव्यास धरत नाही. कामातून त्यांना मिळणारे समाधान हेच त्यांचे यश असते.

नागपूर : समाजात अनेक संस्था आणि लोक समाजासाठी स्वत:ला झोकून देतात. अनेक लोक प्रसिद्धीचाही हव्यास धरत नाही. कामातून त्यांना मिळणारे समाधान हेच त्यांचे यश असते. इतरांचे अश्रू पुसण्यात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखे सुख नाही, हीच आपली संस्कृतीही सांगते. यात रोटरी क्लब हे नाव अग्रगण्य आहे. आज रोटरी डे आहे. यानिमित्ताने रोटरीच्या विविध क्लबतर्फे करण्यात येणाऱ्या विविध सेवेतून समाज समृद्ध करण्याचाच प्रयत्न होतो आहे. पैसा मिळविणे कधीच वाईट नसते. पण पैसा सत्पात्री खर्च करण्यासाठी संस्कार आणि मनाचा मोठेपणा लागतो. सारे जग स्वार्थांधतेने भरलेले असताना काही लोक चांगली कामे करीत असतात. त्यांच्या कार्यात सातत्य असते आणि या कार्यातून अनेक गरजूंना जगण्याची प्रेरणा मिळते. त्यांच्या आयुष्यातले दु:ख कमी होते. रोटरीचे विविध क्लब व्रतस्थपणे हे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. जेथे पैशांची गरज आहे तेथे पैसाही मोठ्या प्रमाणात उभा करीत आहे. पदरमोड करून आॅपरेशन थिएटर्स, आरोग्य शिबिरे, शस्त्रक्रिया करून देण्याचे काम रोटरीतर्फे करण्यात येत आहे. आयुष्यभर एखादी शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसा जमवू न शकणाऱ्या गरीब आणि दुर्गम भागातील रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्याचे आरोग्य सुधारण्याचा हा संकल्पच दैवी आहे, ईश्वरीय आहे. रोटरी हे काम करते आहे. सर्वच क्लब्सच्या कार्यावर एक नजर टाकली तर सहजपणे एक बाब जाणवते. प्रत्येक क्लब वेगवेगळ्या कार्यासह आरोग्य सेवेसाठी प्रामुख्याने झटत आहे. रोटरीमुळे दुर्गम भागात आज मोठे रुग्णालय बांधण्यात येत आहेत आणि आदिवासींना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळत आहे. याशिवाय नवी पिढी निर्माण करणे आणि त्यांना संवेदनशील बनविणे गरजेचे आहे. त्याशिवाय सेवेचा यज्ञ अखंड सुरू राहणार नाही. रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना मदत करणे, त्यांच्यावर संस्कार करणे, त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे हे काम जवळपास प्रत्येक क्लबने उचलले आहे. त्यासाठी सर्व सदस्य पुढाकार घेत आहेत. याशिवाय विविध शाळांमध्ये संवाद समूह तयार करणे, नवीन कल्पनांवर काम करणे हे रोटरीचे काम आहे. या साऱ्याच प्रयत्नातून आपला समाज अधिक समृद्ध, निरोगी, निकोप आणि आनंदी करण्याचा हा संकल्प नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास रोटरियन्सना वाटतो, तो सार्थ आहे. रोटरीच्या कार्याचा हा आढावा घेण्याचा प्रयत्न...