शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

-तर मुख्य सचिवांना समन्स बजावू

By admin | Updated: February 18, 2015 02:33 IST

मोटार अपघात दावा लवादातील न्यायाधीशांच्या कमतरतेविषयीच्या प्रकरणात ४ मार्चपर्यंत उत्तर सादर न केल्यास राज्य शासनाच्या मुख्य सचिवांसह इतर प्रतिवादींना समन्स बजावू, ...

नागपूर : मोटार अपघात दावा लवादातील न्यायाधीशांच्या कमतरतेविषयीच्या प्रकरणात ४ मार्चपर्यंत उत्तर सादर न केल्यास राज्य शासनाच्या मुख्य सचिवांसह इतर प्रतिवादींना समन्स बजावू, अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली आहे.यासंदर्भात राजेश गजघाटे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. नागपूर येथे लवादाचे ८ अतिरिक्त न्यायपीठ स्थापन करण्यात यावे व दोन न्यायपीठांतील रिक्त जागा भरण्यात याव्यात, अशी त्यांची विनंती आहे. सध्या नागपुरात लवादाची ४ न्यायपीठे आहेत. न्यायालयाने याप्रकरणात २७ नोव्हेंबर २०१४ रोजी सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली होती. तेव्हापासून प्रतिवादींनी अनेकदा वेळ घेऊनही उत्तर सादर केलेले नाही. यामुळे न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे. याचिकेत राज्य शासनाचे मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे सचिव, गृह विभागाचे सचिव, वित्त विभागाचे सचिव आणि मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.अपघातात ठार झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना व गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना महाराष्ट्र मोटर वाहन नियम-१९८९ अनुसार दावा दाखल केल्यानंतर ४५ दिवसांत तात्पुरती भरपाई, तर ६ महिन्यांत पूर्ण भरपाई मिळायला पाहिजे. परंतु, प्रलंबित दाव्यांची संख्या मोठी असल्यामुळे तात्पुरती भरपाई मिळायलाच २ ते ३ वर्षे लागतात. पूर्ण दावा ६ ते ७ वर्षांनंतर निकाली निघतो. परिणामी पीडितांना उपजीविका चालविणे कठीण जाते. पैसे नसल्याने बरेचदा जखमी व्यक्तीचा मृत्यू होतो. लवादात सध्या सुमारे ८००० दावे प्रलंबित आहेत. दरवर्षी १५०० वर नवीन दावे दाखल होतात. त्यातुलनेत दरवर्षी फार कमी दाव्यांवर अंतिम निर्णय होतो. लवादातील न्यायाधीशांवर कामाचा प्रचंड ताण आहे. न्यायाधीशांची संख्या १२ केल्यास ६ न्यायाधीश जुने दावे तर, ६ न्यायाधीश नवीन दावे निकाली काढतील. अशाप्रकारे पीडितांना वेळेत न्याय देता येईल, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. प्रिया गावंडे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)