मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर धाव घेऊन घोषणाबाजी

By Admin | Updated: December 25, 2014 00:24 IST2014-12-25T00:24:25+5:302014-12-25T00:24:25+5:30

अचानक मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर धाव घेऊन घोषणाबाजी करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील एका तरुणाने आज काही वेळेसाठी मोठी खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांनी

The slogan of the Chief Minister's run in front of the car | मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर धाव घेऊन घोषणाबाजी

मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर धाव घेऊन घोषणाबाजी

अमरावती जिल्ह्यातील तरुणाने उडविली खळबळ
नागपूर : अचानक मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर धाव घेऊन घोषणाबाजी करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील एका तरुणाने आज काही वेळेसाठी मोठी खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांनी त्याला तातडीने ताब्यात घेऊन अंबाझरी पोलिसांच्या हवाली केले.
तुषार निरंजन उमाळे (वय २४) असे या तरुणाचे नाव आहे. तो चिंचोली (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथील रहिवासी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तुषार अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. विदर्भवादी असलेला तुषार आज सकाळी १०.३० वाजतापासून भरतनगर चौकाजवळ थांबून होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते वाहनात बसले आणि त्यांचा काफीला भरतनगर चौकाजवळून निघण्याच्या तयारीत असतानाच तुषार आरडाओरड करीत अचानक मुख्यमंत्र्यांच्या वाहनासमोर आला. ‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’, अशाप्रकारची घोषणाबाजी तो करू लागला. या अनपेक्षित प्रकारामुळे काही वेळेसाठी सुरक्षा रक्षक गोंधळले. मात्र, दुसऱ्याच क्षणाला त्यांनी तुषारला ताब्यात घेऊन अंबाझरी पोलिसांच्या हवाली केले. अंबाझरी पोलिसांनी तुषारला ११.३० वाजता पोलीस ठाण्यात आणले. दुपारी २.३० वाजता ‘पुन्हा असे काही करणार नाही’, या हमीवर तुषारला पोलिसांनी मोकळे केले. (प्रतिनिधी)
फडणवीसांचे स्माईल
काय नेमका प्रकार आहे, त्याची नंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशी केली. सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना झालेला प्रकार सांगितला. त्यावर त्यांनी ‘नो प्रॉब्लेम’म्हणत ‘स्माईल‘ केल्याचे समजते.

Web Title: The slogan of the Chief Minister's run in front of the car