शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीस सहा महिन्यांची मुदतवाढ

By admin | Updated: July 4, 2015 03:03 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १४९ कोटी रुपयांच्या रोखे घोटाळ्याची

‘एनडीसीसी’ बँक घोटाळा : केदारांना हायकोर्टाचा दणकानागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १४९ कोटी रुपयांच्या रोखे घोटाळ्याची महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा-१९६० मधील कलम ८८ अंतर्गत नवीन चौकशी पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. या निर्णयामुळे बँकेचे माजी अध्यक्ष व घोटाळ्यातील मुख्य आरोपी आमदार सुनील केदार यांना फार मोठा दणका बसल्याचे मानले जात आहे. डॉ. सुरेंद्र खरबडे चौकशी अधिकारी असून ते यापुढे कायद्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यास मोकळे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्यासमक्ष प्रकरणावर सुनावणी झाली. २३ डिसेंबर २०१४ रोजी युगलपीठाने ओमप्रकाश कामडी व इतरांची जनहित याचिका निकाली काढताना नवीन चौकशी सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. यानंतर केदार यांनी घोटाळ्याची नवीन चौकशी करताना नव्याने पुरावे गोळा करण्यात यावेत, जुने पुरावे ग्राह्य धरण्यात येऊ नये यासाठी रिट याचिका दाखल केली होती. ही याचिका एकल न्यायपीठाच्या कार्यक्षेत्रात येत होती. १ एप्रिल २०१५ रोजी एकल न्यायपीठाने या याचिकेवरील प्राथमिक सुनावणीनंतर चौकशीवर अंतरिम स्थगनादेश दिला होता. यामुळे खरबडे यांनी चौकशी थांबवली होती. युगलपीठाच्या आदेशान्वये चौकशी पूर्ण करण्याची मुदत २३ जून रोजी संपणार होती. परिणामी खरबडे यांनी चौकशीची मुदत वाढवून देण्यासाठी अर्ज सादर केला होता. अर्जावर यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान खरबडे यांनी चौकशीवरील स्थगनादेशाची माहिती दिली होती. ही घडामोड कळल्यानंतर युगलपीठ संतप्त झाले होते. युगल न्यायपीठाच्या आदेशाची माहिती असतानाही एकल न्यायपीठाकडे जाणे व त्यांना युगल न्यायपीठाच्या आदेशासंदर्भात अंधारात ठेवून चौकशीवर अंतरिम स्थगिती मिळविणे न्यायालयाचा अवमान आहे, असे खडेबोल न्यायालयाने केदार यांना सुनावले होते.दरम्यान, एकलपीठाने केदार यांची रिट याचिका गुणवत्तेवर सुनावणी घेतल्यानंतर फेटाळून लावली. याशिवाय केदार यांनी घोटाळ्याशीच संबंधित पुन्हा एक रिट याचिका दाखल केली होती. ही याचिकाही खारीज करण्यात आली. (प्रतिनिधी)