शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळ्याचा बॉम्ब, ‘पीडब्ल्यूडी’ला ही फोडला घाम !

By admin | Updated: November 30, 2015 02:29 IST

जनहित याचिकाच्या माध्यमातून समाजहितासाठी लढा देणारे अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर यांचा प्रवास अर्ध्यावरच थांबला. त्यांची आत्महत्या अनेकांना धक्का देणारी आहे.

लढवय्ये वकील खंडाळकर यांचा प्रवास अर्ध्यावरच थांबला : समाजहितासाठी अखेरपर्यंत झटलेनागपूर : जनहित याचिकाच्या माध्यमातून समाजहितासाठी लढा देणारे अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर यांचा प्रवास अर्ध्यावरच थांबला. त्यांची आत्महत्या अनेकांना धक्का देणारी आहे. मात्र त्यांचे काम नागपूरकरांच्या स्मरणात राहील. राज्य शासनाने ज्या दोन जनहित याचिकांमुळे सिंचन घोटाळ्याची एसीबी चौकशी करण्याचा निर्णय घेतला, त्यापैकी एका जनहित याचिकेचे कामकाज अ‍ॅड. खंडाळकर यांनी पाहिले होते.हे त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे यश होय. याशिवाय त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्ल्यूडी) सुमारे ११९ कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भातील जनहित याचिकेत मध्यस्थी अर्ज दाखल केला होता. या याचिकेमुळे शासनाला दोषी अधिकारी व कंत्राटदारांविरुद्ध कारवाई करावी लागली. महाराष्ट्र भूमी अभिलेख नागपूर विभागातील गैरव्यवहार खंडाळकर यांच्या याचिकेमुळे प्रकाशात आला होता. ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक उमेश चौबे यांनी अ‍ॅड. खंडाळकर यांच्यामार्फत अनेक जनहित याचिका दाखल केल्या आहेत. या दोघांनी बुटीबोरी ‘एमआयडीसी’च्या प्रवेशद्वारापुढे प्रस्तावित उड्डाण पुलाविरुद्ध जनहित याचिका दाखल केली होती. यामुळे २०१३ पासून या उड्डाणपुलाचे घोडे पुढे सरकू शकले नाही. शेवटी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने समाधानकारक स्पष्टीकरण सादर केल्यामुळे ही याचिका यावर्षी खारीज झाली. याशिवाय डेंग्यू या घातक आजारासाठी कारणीभूत ठरत असलेली शहरातील अस्वच्छता, रामटेक तालुक्यातील मौजा सत्रापूर येथे १ लाखावर वृक्षांची अवैध कत्तल, कोराडी रोडवरील मानकापूर उड्डाणपुलामुळे निर्माण झालेल्या समस्या, भोकारा नाल्यावरील अतिक्रमण, उपराजधानीतील सार्वजनिक भूखंडांच्या दुरुपयोगामुळे शासनाचे झालेले कोट्यवधी रुपयांचे नुकसान, आर्थिक संकटात सापडलेल्या सहकारी पतसंस्थांतील घोटाळ्याची चौकशी व दोषी पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, बनावट कागदपत्रे सादर करून कोळशाच्या कोट्याची अवैधरीत्या उचल, शहरातील कोल्ड स्टोअरेजमधील गैरव्यवहार, खापा आणि माहुरझरी वनपरिक्षेत्रातील अवैध खनन व वृक्षतोड, उमरेड व भिवापूर सामाजिक वनीकरण विभागात मनरेगा योजनेंतर्गत झालेला आर्थिक गैरव्यवहार अशा विषयांवर खंडाळकर यांनी जनहित याचिका दाखल केल्या आहेत.(प्रतिनिधी)