कोर्टात शुभमंगलम् !

By Admin | Updated: October 29, 2015 00:19 IST2015-10-28T23:53:07+5:302015-10-29T00:19:14+5:30

उस्मानाबाद : पारंपरिक होणाऱ्या विवाहावर लाखो रूपये उधळण्याऐवजी कायदेशीर मान्यतेची हमी असणाऱ्या नोंदणी विवाहाचे प्रमाण मागील पाच वर्षांच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून येते.

Shubhamangalam in court! | कोर्टात शुभमंगलम् !

कोर्टात शुभमंगलम् !


उस्मानाबाद : पारंपरिक होणाऱ्या विवाहावर लाखो रूपये उधळण्याऐवजी कायदेशीर मान्यतेची हमी असणाऱ्या नोंदणी विवाहाचे प्रमाण मागील पाच वर्षांच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून येते. २०१० मध्ये ३५ जोडपी नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झाली. परंतु, २०१५ मध्ये आॅक्टोबरअखेर केवळ १३ जोडपी या पद्धतीने विवाहबद्ध झाली.
ना जातीची अडचण ना पैशांची उधळपट्टी, उलट कायदेशीर मान्यता हे, नोंदणी विवाहाचे वैशिष्टे. त्यामुळेच मागील चार-पाच वर्षात सर्वसामान्यांचा कल नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडे वाढला होता. परंतु, परंतु, २०१३ पासून नोंदणी पद्धतीनेचे विवाहाचे प्रमाण कमी होवू लागले आहे. दोन भिन्न जाती किंवा धर्मातील तरूण-तरूणी त्यांच्या घरातून विरोध झाल्यास नोंदणी विवाहाचा पर्याय निवडतात. याशिवाय ज्यांना परदेशी जायचे आहे किंवा तेथे स्थायिक व्हावयचे असेल तर पासपोर्टसाठी नोंदणी विवाहाचे प्रमाणपत्र प्रमुख ‘डाक्युमेंट’ मानले जाते. म्हणून अनेक श्रीमंत कुटुंबातील विवाह नोंदणी पद्धीने केले जातात. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने स्वागत समारंभ केले जातात.
जानेवारी ते डिसेंबर २०१० या कालावधीत ३५ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने शुभमंगलम् उरकले. त्यानंतर औ२०११ मध्ये ही संख्या काही प्रमाणात कमी झाली. ३२ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. तसेच २०१३ मध्ये ही संख्या एकने वाढली. ३३ जोडपीण नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झाली. २०१३ मध्ये मात्र, हे प्रमाण तब्बल ९ ने कमी झाले. या वर्षात अवघी २४ जोडपी या पद्धतीने विवाह बंधनात बांधली गेली. २०१४ मध्ये हे प्रमाण दोनने वाढले. २६ जोडपी याच पद्धतीने विवाहबद्ध झाली. तर चालू वर्षामध्ये म्हणजेच जानेवारी ते आॅक्टोबर २०१५ या दहा महिन्यांच्या कालावधीत केवळ १३ जोडपी नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झाली. एकूणच २०१० च्या तुलनेत नोंदणी विवाहांची संख्या तब्बल पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक कमी झाली आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Shubhamangalam in court!