शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

श्रीसूर्या समूहावरकाय कारवाई केली?

By admin | Updated: July 17, 2014 01:09 IST

शेकडो गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या श्रीसूर्या समूहावर आतापर्यंत काय कारवाई केली यासंदर्भात येत्या दोन आठवड्यात विस्तृत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या

हायकोर्टाची विचारणा : शासनाला मागितले प्रतिज्ञापत्रनागपूर : शेकडो गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या श्रीसूर्या समूहावर आतापर्यंत काय कारवाई केली यासंदर्भात येत्या दोन आठवड्यात विस्तृत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग यांनी आज बुधवारी दिलेत.फेब्रुवारी-२०१३ मध्ये घोटाळा उघडकीस आल्यानंतर शासनाने श्रीसूर्या समूहाची मालमत्ता त्वरित ताब्यात घेणे आवश्यक होते. परंतु, वेगवान कारवाई झाली नसल्याने समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशीला मालमत्तेची विल्हेवाट लावण्यासाठी भरपूर वेळ मिळाला, असे याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अनिल किलोर यांनी सांगितले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने वरील निर्देश दिलेत. श्रीसूर्या समूह घोटाळ्यासंदर्भातील विविध याचिकांवर न्यायालयात एकत्र सुनावणी करण्यात येत आहे. श्रीसूर्या पीडित ठेवीदार कृती समितीने याप्रकरणाचा ‘सीबीआय’मार्फत तपास करण्याची विनंती केली आहे. शेकडो गुंतवणुकदारांच्या ठेवी स्वीकारणारी श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनी ही भागीदारी कायदा व कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत नाही. तसेच, या कंपनीने गुंतवणूक योजना राबविताना रिझर्व्ह बँकेची परवानगीही घेतली नव्हती. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विष्णू भोये यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून हा खुलासा केला होता. जोशी दाम्पत्याविरुद्ध राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात १४ सप्टेंबर २०१३ रोजी भादंविच्या कलम ४२०, ३४ आणि महाराष्ट्र ठेवीदारांचे हित व संरक्षण कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. समीरला १५ आॅक्टोबर, तर पल्लवीला २९ आॅक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. १२ डिसेंबर रोजी जेएमएफसी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी २१ साक्षीदार व १८२ गुंतवणुकदारांचे बयान नोंदविले आहे. ५ लाख ५० हजार रुपये जमा असलेली ६० बँक खाती व १४ कोटी ६५ लाख ६ हजार २८१ रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केल्याची माहिती भोये यांनी दिली होती. शासनातर्फे एपीपी संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले. (प्रतिनिधी)