श्रीराम जन्मभूमी मंदिर निधी समर्पण अभियानाचा आज शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:10 IST2021-01-16T04:10:01+5:302021-01-16T04:10:01+5:30

नागपूर : श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर निर्माण करण्याचे कार्य श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासतर्फे प्रारंभ झालेले आहे. या मंदिराकरिता सामान्य ...

Shriram Janmabhoomi Mandir Nidhi Samarpan Abhiyan launched today | श्रीराम जन्मभूमी मंदिर निधी समर्पण अभियानाचा आज शुभारंभ

श्रीराम जन्मभूमी मंदिर निधी समर्पण अभियानाचा आज शुभारंभ

नागपूर : श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर निर्माण करण्याचे कार्य श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासतर्फे प्रारंभ झालेले आहे. या मंदिराकरिता सामान्य जनतेचा भावनिक सहभाग असावा या उद्देशाने न्यासातर्फे घरोघरी संपर्क करून निधी समर्पणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. १५ जानेवारी रोजी विदर्भ प्रांतातील प्रत्येक तालुका तथा ग्रामस्तरावर वेगवेगळ्या आयोजनांनी याची सुरुवात करण्यात येणार आहे . सायंकाळी ७.३० वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व हिंदू धर्म आचार्य सभेचे अध्यक्ष जुनापीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांच्या विशेष उपस्थितीत विदर्भ प्रांत निधी समर्पण अभियानाचा शुभारंभ होणार आहे. पोद्दारेश्वर राममंदिर येथे हा कार्यक्रम होईल. १५ फेब्रुवारी पर्यंत निधी संकलन केल्या जाईल.

Web Title: Shriram Janmabhoomi Mandir Nidhi Samarpan Abhiyan launched today