शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण कारवाईच्या विरोधात दुकानदारांचा बंद

By admin | Updated: May 21, 2015 02:34 IST

सीताबर्डी मेनरोडवर अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली १२५ दुकाने तोडण्यात आली. यातील अनेक दुकानांचे बांधकाम वैध आहे.

नागपूर : सीताबर्डी मेनरोडवर अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली १२५ दुकाने तोडण्यात आली. यातील अनेक दुकानांचे बांधकाम वैध आहे. या अन्यायाच्या विरोधात बुधवारी सीताबर्डी मेनरोडवरील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून महापालिका व पोलीस प्रशासनाचा निषेध केला.व्यापाऱ्यांना कोणत्याही स्वरूपाची सूचना वा नोटीस न बजावता ही कारवाई करण्यात आली. अधिकारी हुकूमशहासारखे वागले. व्यापाऱ्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कारवाईवर नाराजी व्यक्त केली. सीताबर्डी मेनरोड पूर्वी १८ फुटाचा होता. १९५८ नंतर तो ४४ फुटाचा करण्यात आला. तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी अतिक्रमण हटवून रस्ता ६० फुटाचा केला. त्यानुसार येथील दुकाने वैध ठरविण्यात आली होती. १५ वर्षापूर्वी एम.एस. पांडे अ‍ॅन्ड सन्स ते बुटी वाडा परिसरापर्यतची दुकाने आधीच हटविण्यात आली आहे. त्यामुळे आता अतिक्रमणाचा प्रश्न येतोचे कुठे असे व्यापाऱ्यांचे म्हणणे होते. वाहतूक पोलिसांना सीताबर्डी चौकातील आॅटोची अवैध वाहतूक दिसत नाही. अपघाताला धोका असूनही त्यांचेवर कारवाई केली जात आहे. दुसरीकडे वर्दळीच्या भागात हातगाडीवाले फिरतात ते मनपा अधिकाऱ्यांना का दिसत नाही. असा प्रश्न व्यापाऱ्यांनी केला. (प्रतिनिधी)४२ वर्षांपूर्वीचे दुकान तोडलेमंगळवारी करण्यात आलेली अतिक्रमण हटविण्याची कारवाई चुकीची व बेकायदेशीर असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. अतिक्रमण विरोधी पथकाने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना वा नोटीस न देता ४२ वर्षापर्वीचे दुकान तोडल्याचा आरोप जुगलकिशोर अरोरा यांनी केला. पोलिसांनी त्यांचा मुलगा विनीत अरोरा याला अकारण मारहाण केली. यामुळे तो जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.हॉकर्सची गर्दी सीताबर्डी मेनरोडवर हॉकर्सचे अतिक्रमण आहे. परंतु मनपा व पोलीस विभाग त्यांच्या विरोधात क ोणतीही कारवाई करीत नसल्याचे सीताबर्डी व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप गुप्ता यांनी सांगितले. कारवाईच्या नावाखाली व्यापाऱ्यांना त्रस्त करण्याचा हा प्रकार असल्याचे ते म्हणाले. हाताला गंभीर जखमपापे जूस सेंटर फूटपाथपासून आत आहे. असे असतानाही ४२ वर्षापूवींचे दुकान तोडण्यात आले. कारवाई दरम्यान हाताला गंभीर जखम झाल्याचे विनीत अरोरा यांनी सांगितले. अतिक्रमणाच्या नावाखाली दुकान तोडल्याने रोजगाराचा प्रश्न उभा ठाकल्याची व्यथा त्यांनी मांडली. अन्यायाचा विरोध करू व्यापाऱ्यांना हकनाक वेठीस धरले जात आहे. या अन्यायाचा विरोध करण्याचा इशारा व्यापारी जोगीनारायण चौरसिया यांनी दिला आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी बुधवारी दुकान बंद ठेवली. नुकसान भरपाई द्यावीअतिक्रमण कारवाईच्या नावाखाली व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही व्यापाऱ्यांना दुकानातून सामान काढण्यालाही वेळ दिला नाही. विनाकारण दुकानाचे शटर तोडण्यात आले. झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव गणेश मुदलीयार यांनी केली आहे.ही तर अधिकाऱ्यांची हुकूमशाही!अतिक्रमण हटविण्याचा नावाखाली मनपाच्या प्रवर्र्तन विभागाने नोटीस न देता कारवाई केल्याने व्यापाऱ्यात भीती निर्माण झाली आहे. अशा हुकूमशाही कारवाईचा निषेध करीत असल्याचे सीताबर्डी व्यापारी असोसिएशनचे सचिव विजयकुमार अग्रवाल म्हणाले.सीताबर्डी मेनरोडवरील ५० दुकाने प्रवर्तन विभागाच्या निर्देशावरून हटविण्यात आली. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. या संदर्भात योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.