बंद गोदामात आढळले शीर

By Admin | Updated: January 3, 2017 02:39 IST2017-01-03T02:39:44+5:302017-01-03T02:39:44+5:30

कोराडी नाक्याजवळच्या बंद गोदामात एक मानवी शीर लटकवून असल्याचे आढळल्याने सर्वत्र खळबळ

Sheer found in closed godown | बंद गोदामात आढळले शीर

बंद गोदामात आढळले शीर

धड बेपत्ता, नरबळीची शंका : परिसरात खळबळ, पोलिसांची चुप्पी
नागपूर : कोराडी नाक्याजवळच्या बंद गोदामात एक मानवी शीर लटकवून असल्याचे आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे शीर वायरने (केबल) बांधून (लटकवून) आहे. तर, धड बेपत्ता आहे. शिराखाली काही हाडेही पडून आहेत. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार असल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू झाली आहे.
कोराडी नाक्याजवळ हे गोदाम असून ते अनेक दिवसांपासून बंद असल्याचे सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी काही जण गोदामाजवळ गेले. त्यातील एकाने बंद गोदामाच्या खिडकीतून डोकावले असता त्याला मानवी शीर लटकलेले दिसले.
त्यामुळे घाबरून हे सर्व जण चौकाकडे पळत आले. नंतर ही वार्ता कर्णोपकर्णी सर्वत्र पोहचली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली.

मृत कोण, मारले कसे ?
ज्याचे शीर लटकवून ठेवण्यात आले, तो तरुण कोण आहे आणि त्याला मारणारे आरोपी कोण आहे, ते तूर्त अंधारात आहे. पोलीस त्याचा तपास करीत आहेत. विशेष म्हणजे, खूप दिवसांपासून बंद असलेल्या गोदामात आरोपी शिरले कसे, असाही प्रश्न आहे. त्यांनी मृताची हत्या तेथेच केली आणि धड तेथून पळवून नेले की आधी हत्या केली आणि गोदामात नरबळीसाठी केला जातो, तसा पूजाविधी केला की काय, त्याबाबत कोराडी पोलिसांकडे वारंवार विचारणा करूनही माहिती मिळाली नाही. रात्री ९ वाजेपर्यंत गुन्हा दाखल व्हायचा आहे, असे पोलीस ठाण्यातून सांगितले जात होते.

Web Title: Sheer found in closed godown