शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
4
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
5
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
6
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
7
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
8
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
9
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
10
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
11
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
12
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
13
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
14
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
15
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
16
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
17
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
18
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
19
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
20
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ हक्क गमावून बसली

By admin | Updated: July 11, 2015 03:05 IST

कौटुंबिक न्यायालयात पतीने दाखल केलेल्या घटस्फोट याचिकेचा पाठपुरावा न केल्याने एका महिलेला स्वत:चा आणि मुलीचाही हक्क गमवावा लागला.

राहुल अवसरे नागपूरकौटुंबिक न्यायालयात पतीने दाखल केलेल्या घटस्फोट याचिकेचा पाठपुरावा न केल्याने एका महिलेला स्वत:चा आणि मुलीचाही हक्क गमवावा लागला. जुनी शुक्रवारी भागातील एका दुर्दैवी मायलेकीची ही कहाणी आहे. मुलगी केवळ पाच वर्षांची आहे. २०१० मध्ये या महिलेच्या पतीने न्यायालयात पत्नीपासून घटस्फोट मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. महिलेने या याचिकेचा पाठपुरावा केला नव्हता. तिने आपले लिखित बयाण न्यायालयात दाखल केले नव्हते. १६ सप्टेंबर २०११ रोजी पतीच्या बाजूने निकाल लागून त्याला घटस्फोट मिळाला होता. निकाल लागल्याच्या तेरा दिवसानंतर २९ सप्टेंबर २०११ रोजी दुर्दैवाने तिच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे ती घटस्फोटाच्या आदेशाला आव्हानही देऊ शकली नव्हती. ३० सप्टेंबर २०१४ रोजी तिने आपल्या मुलीसह हिंदू अ‍ॅडप्शन अँड मेन्टेनन्स अ‍ॅक्ट १९५६ च्या कलम १८, १९ आणि २० अन्वये उदरनिर्वाहासाठी आपली सासू आणि दोन दिरांविरुद्ध याचिका दाखल केली होती. याचिकेत तिने दरमहा २० हजार रुपये उदरनिर्वाहाचा आणि १५ हजार रुपये दाव्याचा खर्च मागितला होता. या पार्श्वभूमीवर प्रतिवादी सासू आणि दिरांनी न्यायालयात एक अर्ज दाखल केला होता. घटस्फोट झाल्यानंतर याचिकाकर्त्यांसोबतचे आमचे संपुष्टात आले आहे. त्यामुळे या कायद्याच्या प्रावधानानुसार ही याचिका ग्राह्य धरण्यात येऊ नये. याचिकाकर्त्या महिलेने यावर उत्तर देताना असे नमूद केले की, आपल्या पतीच्या मृत्यूनंतर एलआयसीचा लाभ केवळ प्रतिवादींनी घेतला. त्यांचा आक्षेप बेकायदेशीर ठरवावा. न्यायालयाचा निष्कर्ष दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की, या कायद्याच्या कलम १८ अंतर्गत पत्नीच्या निर्वाहाचे प्रावधान आहे. परंतु ती हा दावा पती हयात असताना करू शकते. त्यामुळे हे कलम या याचिकेत ग्राह्य धरता येऊ शकत नाही. कलम १९ हे विधवा सुनेच्या उदरनिर्वाहसाठी आहे. परंतु ती प्रतिवादी सासूची विधवा सूनही राहिलेली नाही कारण घटस्फोट झाल्यानंतर पतीचा मृत्यू झाला. घटस्फोटानंतर सारीच नाती संपुष्टात येतात. कलम २० हे लहान मुलांच्या निर्वाहासाठी आहे. या कायद्यात मुलगा केवळ आई-वडिलांविरुद्धच दावा करू शकतो. वडीलच हयात नसल्याने याचिकाकर्त्या मुलीलाही हे कलम लागू पडत नाही. याचिकाकर्त्या महिलेसाठी घटस्फोटाची याचिका अंतिम ठरली. याचिकेचा पाठपुरावा न करण्याची तिला भारी किंमत चुकवावी लागली. स्वत:बरोबर मुलीचाही हक्क गमवावा लागला, असेही निष्कर्ष न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले. या महिलेची आणि मुलीची याचिका फेटाळण्यात आली. प्रतिवादीच्या अर्जास मंजुरी देण्यात आली.