शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

नागपुरात एसीबीच्या अधीक्षकांविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 12:44 AM

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नागपूर परिक्षेत्राचे अधीक्षक (उपायुक्त) पी. आर. पाटील यांच्याविरुद्ध लैंगिक छळ केल्याच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. एसीबीत कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर मंगळवारी येथील सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पातळीवर त्याची माहितीवजा चर्चा सुरू झाल्याने राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमुंबईहून आलेल्या महिला अधिकाऱ्याने केली शहानिशा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नागपूर परिक्षेत्राचे अधीक्षक (उपायुक्त) पी. आर. पाटील यांच्याविरुद्ध लैंगिक छळ केल्याच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. एसीबीत कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर मंगळवारी येथील सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पातळीवर त्याची माहितीवजा चर्चा सुरू झाल्याने राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.महाराष्ट लोकसेवा आयोगामार्फत पोलीस दलात थेट उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून दाखल झालेले पाटील आधी सोलापुरात सेवारत होते. तेथून त्यांची बदली पुण्याला उपायुक्त म्हणून झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, पुण्यात त्यांच्या कामावर नाराज असलेल्या पोलीस आयुक्तांनी त्यांचा सेवा अहवाल समाधानकारक नसल्याचे कळविल्याने त्यांची बदली पोलीस अधीक्षक पीसीआर म्हणून करण्यात आली. हे पद पोलीस दलात मानहानीचे मानले जाते. त्यामुळे की काय, पाटील यांनी अधीक्षक पीसीआर म्हणून पद स्वीकारण्याचे टाळले. त्यानंतर काही दिवसातच त्यांची एसीबीचे उपायुक्त म्हणून नागपुरात बदली झाली. राजकीय वजन वापरून त्यांनी ही बदली करून घेण्यात यश मिळवल्याचे त्यावेळी पोलीस दलात बोलले जात होते. गेल्या दीड वर्षांपासून ते नागपुरात कार्यरत आहेत. त्यांच्या अधिकारक्षेत्रात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील एसीबीची कार्यालये येतात.विनयभंगाची तक्रार करणारी महिला येथील एसीबीच्या कार्यालयात कर्तव्यावर आहे. तिच्या तक्रारीनुसार, वेगवेगळ्या कारणाने पाटील यांनी तिच्याशी सलगी साधण्याचे प्रयत्न केले. तिने प्रतिसाद दिला नाही म्हणून पाटील यांनी तिचा छळ चालवला. त्यामुळे तिने त्यांची तक्रार एसीबीच्या वरिष्ठांकडे केली. एका अधीक्षकावर महिला कर्मचाऱ्याकडून गंभीर आरोप लावला जात असल्याने एसीबीच्या महासंचालकांकडून त्याची गंभीर दखल घेण्यात आली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यात तथ्य आढळल्याने मुंबईहून एसीबीच्या एसीपी दर्जाची महिला अधिकारी मंगळवारी नागपुरात पोहचली. त्यांनी येथील वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर तक्रारदार महिला कर्मचाऱ्यासह सदर पोलीस ठाणे गाठले. सदरमधील अधिकाऱ्याच्या कक्षात महिला कर्मचाऱ्याची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. दरम्यान, एका पोलीस अधीक्षकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.चर्चा अन् गोपनीयता !पोलीस दल आणि खासकरून एसीबीसाठी प्रचंड लांच्छनास्पद ठरलेल्या या घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून संबंधितांकडून स्थानिक पातळीवर कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे. वरिष्ठ पातळीवर मात्र या घडामोडीने चर्चेचे रान पेटवले आहे. विशेष म्हणजे, पाटील गेल्या दोन महिन्यापासून एका वेगळ्या प्रकरणाच्या संबंधाने नागपुरात चर्चेला आले होते. या संबंधाने अधीक्षक पाटील यांच्याशी संपर्क केला असता ते उपलब्ध झाले नाही.मेसेज पाठवून बदनामी करण्याचीही धमकीमहिलेने पोलीस ठाण्यात सहा पानाचे तक्रारवजा बयान नोंदविले. त्यात पाटील वर्षभरापासून तिचा कसा छळ करीत होते, त्याची सविस्तर माहिती होती. पाटील केवळ कार्यालयातच तिला बोलत नव्हते तर ती घरी असताना तिला मेसेज, फोन करून संपर्कात राहण्यास सांगत होते. तिला तिचे फोटो पाठविण्याचा वारंवार आग्रह धरत होते. महिला कर्मचाऱ्याने विरोध नोंदवला असता पाटीलने तिला तुझ्या पतीला तुझे बाहेर अफेअर आहे, हे सांगेन तसेच बदनामी करेन, अशी धमकीही दिली होती. हा सर्व प्रकार कथन करतानाच मुंबईतील महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वातील विशाखा समितीसमोर पाटील यांनी पाठविलेले घाणेरडे मेसेजही दाखवल्याचे समजते. ते बघितल्यानंतरच विशाखा समितीतील चारही सदस्यांनी लगेच एसबीच्या महासंचालकांना अहवाल कळवून पाटीलविरुद्ध तक्रार दाखल करण्यास हरकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास वरिष्ठ पातळीवरून परवानगी मिळाली. परिणामी केवळ विनयभंगाचे कलम ३५४ नव्हे तर या कलमासोबत पोलिसांनी लिखित धमकी (मेसेज) देण्याच्या आरोपावरून कलम ५०६, ५०९ अन्वये गुन्हा दाखल केला.

 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग