सावत्र बापाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; डुमरी शिवारातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 18:01 IST2022-12-17T17:59:25+5:302022-12-17T18:01:00+5:30

फरार आराेपीचा शाेध सुरू

Sexual abuse of minor girl by stepfather; shocking incident in Dumri Shivar of Nagpur | सावत्र बापाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; डुमरी शिवारातील घटना

सावत्र बापाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; डुमरी शिवारातील घटना

नागपूर : सावत्र बापाने १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करीत तिला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डुमरी शिवारात नुकतीच घडली. आराेपी फरार असल्याने त्याचा शाेध सुरू असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

श्यामलाल बाेरकर (५०, रा. आसगाव, ता. पवनी, जि. भंडारा) असे आराेपी बापाचे नाव आहे. पीडित मुलगी १६ वर्षांची असून, ती सन २०२८ पासून तिच्या आईसाेबत डुमरी (ता. पारशिवनी) शिवारातील शेतात राहते. ती मजुरी करीत आईला हातभार लावते. तिच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर आईने श्यामलालसाेबत दुसरे लग्न केले. त्यामुळे श्यामलाल देखील डुमरी शिवारात राहायला आला.

त्याने सावत्र मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. तिने प्रतिकार करताच त्याने तिला जीवे मारण्याची व या प्रकाराची कुठेही वाच्यता न करण्याची धमकीही दिली. हा प्रकार असह्य झाल्याने शेवटी तिने पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी भादंवि ३७६ (२)(एन), ३२३, ५०६, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२, सहकलम १२, ४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आराेपी फरार असून, त्याचा शाेध सुरू असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Web Title: Sexual abuse of minor girl by stepfather; shocking incident in Dumri Shivar of Nagpur