१४ कोटीतून साकारणार सात ‘मॉड्युलर ओटी’

By Admin | Updated: February 13, 2016 02:33 IST2016-02-13T02:33:18+5:302016-02-13T02:33:18+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) सहा व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील एक असे मिळून सात शस्त्रक्रियागृह (आॅपरेशन थिएटर) अद्ययावत (मॉड्युलर) करण्यासाठी ..

Seven 'modular OT' to be achieved from 14 crores | १४ कोटीतून साकारणार सात ‘मॉड्युलर ओटी’

१४ कोटीतून साकारणार सात ‘मॉड्युलर ओटी’

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) सहा व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील एक असे मिळून सात शस्त्रक्रियागृह (आॅपरेशन थिएटर) अद्ययावत (मॉड्युलर) करण्यासाठी पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेतून १४ कोटी रुपयांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या कामाची सुरुवात ‘किडनी ट्रान्सप्लांट’च्या शस्त्रक्रिया गृहापासून होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजना आणि जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नवनवीन विभागाचे बांधकाम आणि अद्ययावत यंत्रसामुग्रीमुळे येत्या वर्षात मेडिकलचा चेहरामोहरा बदललेला दिसणार आहे. ‘ट्रामा केअर सेंटर’चे लोकार्पण पुढील महिन्यात होत आहे. ३०-३० खाटांचे तीन अतिदक्षता विभागाच्या बांधकामालाही लवकरच सुरुवात होत आहे. आता यात अद्ययावत शस्त्रक्रियागृहाची भर पडणार आहे.
पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेच्या १५० कोटींमधून १४ कोटी या गृहावर खर्च केले जाणार आहे. याला प्रशासकीय मंजुरी नुकतीच मिळाली आहे. निविदाही काढण्यात आल्या असून, राज्याबाहेरील एका एजन्सीला हे काम मिळाल्याची माहिती आहे. ‘मॉड्युलर ओटी’ची सुरुवात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून होत आहे. येथील यूरोलॉजी विभागासाठी दहा वर्षांपूर्वी शस्त्रक्रियागृहाचे बांधकाम झाले. परंतु त्याचा विकासच झाला नाही. नुकतेच किडनी ट्रान्सप्लांट यशस्वी पार पडल्याने आता या गृहाचा उपयोग ट्रान्सप्लांटसाठी होणार आहे. येथे दोन ‘मॉड्युलर ओटी’ तयार करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Seven 'modular OT' to be achieved from 14 crores